27 December 2024 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

युपी जिल्हा पंचायत निवडणूक | राम नगरी अयोध्येत भाजपचा पराभव | मोदींच्या काशी आणि श्रीकृष्णांच्या मथुरेतही पराभव

Uttar Pradesh Panchayat Samiti Election 2021

अयोध्या, ०४ मे | पश्चिम बंगालनंतर आता उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांनी भारतीय जनता पक्षाची झोप उडण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीसह राज्यभरात सपाने भारतीय जनता पक्षाला चितपट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही जिल्हे योगी आदित्यनाथ सरकारच्या अजेंड्यामध्ये नेहमी असतात. या तीन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून योगी सरकारने खूप मेहरबानीदेखील केली आहे. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत झालेली पडझड भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठे संकेत देत आहे.

राम नगरी अयोध्येत भारतीय जनता पक्षाला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. अयोध्येतील एकूण जिल्हा पंचायत समितीच्या 40 जागा आहेत. त्यापैकी 24 जागांवर समाजवादी पार्टीचा विजय झाला आहे. तसा दावा समाजवादी पार्टीने केला आहे. तर राम नगरी अयोध्येत भाजपला केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी 12 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. बंडखोरीमुळे भाजपला हा फटका बसल्याचं सांगितलं जातं. तिकीट न मिळाल्याने 13 जागांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती. दुसरीकडे सर्व अपक्ष उमेदवार भाजपच्या सोबत असल्याचा दावा भाजपने केला आहे.

मोदींच्या काशीत सपाचा विजय:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणासीतही भारतीय जनता पक्षाला पराभवाचा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे. काशीत जिल्हा पंचायत समितीच्या एकूण 40 जागा आहे. त्यापैकी केवळ आठ जागांवरच भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला आहे. तर समाजवादी पार्टीला 14 आणि बसपाला पाच जागांवर विजय मिळाला आहे. तर वाराणासीमध्ये अपना दल (एस)ला तीन जागांवर विजय मिळाला आहे. आम आदमी पार्टी आणि ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. त्याशिवाय तीन अपक्षही विजयी झाले आहेत. 2015मध्ये भाजपला काशीमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र, योगी सरकार आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने काशीमध्ये पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केलं होतं.

श्रीकृष्णांच्या मथुरेतही पदरी निराशा:
भगवान श्रीकृष्णांची नगरी समजल्या जाणाऱ्या मथुरेतही भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. मथुरेमध्ये बसपाने बाजी मारली आहे. बसपाने 12, आरएलडीने 9 जागंवर विजय मिळविला आहे. तर भाजपाला 8 जागा मिळाल्या आहेत. सपाला 1च जागा जिंकता आली आहे. 3 अपक्ष जिंकले आहेत. मथुरेत काँग्रेसच्या झोळीत भोपळा आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षच निवडणूकीत पडले आहेत. मथुरेत शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे भाजपाला पराभव पत्करावा लागल्याचे सांगितले जात आहे.

 

News English Summary: From Ayodhya to Mathura and across the state, including Kashi, the SP has swayed the Bharatiya Janata Party. Importantly, these three districts are always on the agenda of the Yogi Adityanath government. The Yogi government has also shown a lot of kindness in these three districts for the last four years. Due to this, the fall in these three districts is giving a big signal to the BJP for the coming assembly elections.

News English Title: Uttar Pradesh Panchayat Samiti Election 2021 BJP lost in Ayodhya Mathura and Varanasi too news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x