20 April 2025 10:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

उन्नाव बलात्कार पीडितेचा अखेर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू

Delhi Safdarjung hospital, Uttar Pradesh unnao rape victim

नवी दिल्ली : उन्नाव सामूहिक बलात्कारपीडितेचा रात्री उशिरा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. पाच जणांनी पीडितेला जिवंत पेटवून दिलं होतं. यात ती ९० टक्के भाजली होती. सफदरजंग रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी पीडितेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उन्नावमध्येही सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पीडितेला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती ९० टक्के भाजली होती. तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं होतं.

तिच्यावर गेल्यावर्षी बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला दहा दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार आहे. गुरुवारी सकाळी पाच जणांनी तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून दिले होते. नंतर तिला जखमी अवस्थेत लखनौ येथे आणि नंतर तेथून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्ली वाहतूक पोलिसांनी तिला विमानतळावरून तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी विनाअडथळा हरित मार्गिका उपलब्ध करून दिली होती.

सफदरजंग रुग्णालयातील बर्न अ‍ॅण्ड प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. शलभकुमार यांनी सांगितले की, “पीडितेला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र तिला वाचवू शकलो नाही. संध्याकाळी तिची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. रात्री १०.१० वाजता तिला हृदयविकाराचा झटका आला. आम्ही उपचार सुरू केले आणि तिला वाचविण्याचे संपूर्ण प्रयत्न केले. मात्र, रात्री ११.४० वाजता तिचे निधन झाले.”

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या