26 January 2025 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC
x

गुडघ्यावर फाटलेली जीन्स, पायात गमबूट, अशा महिला काय संस्कार देणार | भाजपा मुख्यमंत्र्यांचं विधान

Uttarkhand CM Tirath Singh Rawat,  Women, ripped Jeans

देहराडून, १७ मार्च: उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तीरथ सिंह रावत यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमळु ते सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. ते मंगळवारी देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तरुण-तरुणींना संस्काराचे महत्व पटवून देताना रावत यांची जीभ चांगलीच घसरली.

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडिल जबाबदार असतात, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. “एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला.

महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं” असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. काही दिवसांवपूर्वी रावत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ही प्रभू रामासोबत केली होती.

 

News English Summary: They are becoming huge trolls on social media due to the pearls scattered by Tirath Singh Rawat. He was speaking at an event in Dehradun on Tuesday. At this time, while convincing the youth about the importance of rites, Rawat’s tongue slipped.

News English Title: Uttarkhand Chief Minister Tirath Singh Rawat Comment on women ripped Jeans news updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x