22 November 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

लस घेऊनही कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Vaccination

नवी दिल्ली, १८ जून | देशात कोरोना संसर्गाचा वेग काहीसा आटोक्यात येताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, 3 मे पासून रिकव्हरी रेट वाढत असून, सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात घटत आहे. 11 जून ते 17 जूनदरम्यान, 513 जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांपेक्षाही कमी राहिला. मागील 24 तासात देशात 62,480 नवे रुग्ण सापडले. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 11 दिवसांपासून रुग्णसंख्या एक लाखांपेक्षा कमी दिसत आहे.

दरम्यान, केंद्रीय नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना जरी कोरोनाची लागण झाली, तरी त्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण हे 75-80 टक्क्यांपेक्षा कमी आहे. नव्या अभ्यासात हे समोर आलं आहे. इतकंच नाही तर लस घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देण्याचं गरज केवळ 8 टक्के इतकी आहे. तर अशा रुग्णांना ICU मध्ये ठेवण्याचं प्रमाण केवळ 6 टक्के इतकं आहे. तसंच लस घेऊनही कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Vaccines Cut Hospitalization Risk by 80 percent Give 94 percent Protection Against Covid 19 union Health Ministry news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x