23 February 2025 2:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

विकास दुबे तर बदमाश होताच, पण पोलीस सुद्धा बदमाश निघाले - प्रकाश आंबेडकर

Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, Gangster Vikas Dubey Encounter, Yogi Sarkar

कानपूर, १० जुलै : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.

आज सकाळी ७.१५ ते ७.३५ च्या दरम्यान उत्तर प्रदेशची एसटीएफ टीमसोबत झालेल्या झटापटीत मारला गेला. विकास दुबेने पोलिसांची बंदुक घेण्याच्या प्रयत्न केला. या झटापटीत एका गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामध्ये तो मारला गेला. काहीजणांच्या म्हणण्यानुसार एन्काऊंटर हा एक बनाव आहे. पोलीस आणि एसटीएफची टीम १० जुलै रोजी दुबेला घेऊन कानपूरला निघाली होती. कानपुर नगरच्या पोलिसांमध्ये आणि दुबेमध्ये झटापट झाली. यामध्ये गाडीचा अपघात झाला. दुबे पळून जाताना एन्काऊंटरमध्ये मारला गेला.

दरम्यान, सर्वच थरातून वेगळाच संशय व्यक्त करण्यात आला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील टीका केली आहे. त्यांनी या विषयाला अनुसरून ट्विट केलं आहे की, “विकास दुबे तर बदमाश होताच, पण पोलीस सुद्धा बदमाश निघाली, विकास दुबेमुळे अनेकांची नावं आणि कामं समोर येण्याची अपेक्षा होती, आता मात्र ती अपेक्षा मावळली आहे.

 

News English Summary: Prakash Ambedkar, head of the Vanchit Bahujan Aghadi, has also criticized. He tweeted, “Vikas Dubey was a scoundrel, but the police were also scoundrels. Vikas Dubey was expected to reveal the names and deeds of many, but now that expectation has been dashed.”

News English Title: VBA leader Prakash Ambedkar slams Yogi Government after encounter of Gangster Vikas Dubey News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x