किराणा दुकानांवरील कर्मचारी आणि फेरीवाल्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका अधिक - केंद्र सरकार
नवी दिल्ली, ८ ऑगस्ट: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९३३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीनुसार आता देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट ६७.६२ टक्के आहे.
भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २० लाख ८८ हजार ६१२ वर पोहोचली आहे. तर ६ लाख १९ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १४ लाख २७ हजार ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४२ हजार ५१८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, किराणा दुकानांवर काम करणारे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. अशा लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित होऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना, अशा लोकांची वेगाने तपासणी करण्यात यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. आरोग्य मंत्राल्याने म्हटल्या प्रमाणे, यामुळे मृत्यू दर कमी होण्यासही मदत मिळू शकते. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लिहिलेल्या पत्रात आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी हा सल्ला दिला आहे.
आरोग्य मंत्रालयाने या पत्रात म्हटले आहे, की “बंद असलेल्या कामाच्या ठिकाणी इंडस्ट्रिअल क्लस्टर्स असू शकतात, जेथे अधिकांश कोरोनाबाधित असलेल्या ठिकानांवरून लोक येत आहेत. झोपडपट्ट्या, जेल, वृद्धाश्रमांतदेखील हॉटस्पॉट असू शकतात. या शिवाय किराणा दुकानवाले, भाजी विक्रेते आणि इतरही काही विक्रेते संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात, असे भाग आणि अशा कोलांची तपासणी ICMR च्या गाइडलाइन्स प्रमाणे तसेच वेगाने होणे आवश्यक आहे.”
News English Summary: The central government says the risk of corona spreading is highest from those working in grocery stores and street vendors. Such people can infect a large number of people, the central health department said.
News English Title: Vegetable grocery shops and other vendors can be potential corona spreaders Center asks test them News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार