21 November 2024 8:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच बेगडी प्रेम सर्वाना माहीत आहे भाजपच्या बेडकांनो - भाई जगताप

Venkaiah Naidu, MP Udayanraje Bhosale, slogan in Rajya Sabha, Oath

मुंबई, २३ जुलै : भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली.

यानंतर आता राज्यातील काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात, अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचे नाव घेतलेले तुम्हाला चालणार नाही? तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी आहे, हे आम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराज तुम्हाला केवळ निवडणुकांपुरतेच हवे असतात. व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध, असे भाई जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना २० लाख पत्रं पाठवण्यात येणार आहेत. या सर्व पत्रांवर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली असणार आहे. उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली होती. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत अशा घोषणा देऊ नये अशी समज दिली. याच पार्श्वभूमीवर ही पत्रं पाठवण्यात येणार आहेत.

काल राज्यसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. या शपथविधीवेळी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ पूर्ण झाल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली होती . त्यावरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली होती.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना २० लाख पत्रे पाठवण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: BJP leader Udayan Raje Bhosale was sworn in as a Rajya Sabha member in Delhi on Wednesday. The political atmosphere in Maharashtra is likely to heat up due to one such incident. After taking oath, Udayan Raje announced ‘Jai Hind, Jai Maharashtra, Jai Bhavani, Jai Shivaji’.

News English Title: Venkaiah Naidu take objection on MP Udayanraje Bhosale slogan in Rajya Sabha while taking oath News Latest Updates.

हॅशटॅग्स

#ChhatrapatiShivajiMaharaj(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x