दीप सिद्धूशी संबंध नाही | भाजप खासदार सनी देओल'ने हात झटकले

नवी दिल्ली, २६ जानेवारी: मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला आहे. तर, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील दीप सिद्धू हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून, त्याचे पंतप्रधानांबरोबर फोटो असल्याचेही म्हटले आहे.
दुसऱ्या बाजूला भाजपने दीप सिद्धू कार्यकर्ता तसेच निवडणूक प्रचारक असल्याचं अमान्य केलं आहे. मात्र वास्तव हे आहे की दीप सिद्धू’ने २०१९ मधील भाजपाचे उमेदवार सनी देओल यांच्यासाठी घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला होता आणि भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. पंजाबमधील स्थानिक वृत्त वाहिन्यांनी यासंबंधित त्याचं रेकॉडिंग देखील केलं होतं. त्यामुळे या प्रकरणात भाजप उलटं अडकल्याची चर्चा आहे.
DeepSidhu can be seen campaigning to BJP candidate Sunny Deol in 2019 pic.twitter.com/w08FAU5LWx
— Facts check (@Facts_chek) January 27, 2021
२०१९ साली सनी देओल यांनी पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. जनतेनं दिलेल्या भरघोस मतांमुळे या निवडणुकीत सनी देओल यांनी विजयही मिळवला होता. याच निवडणुकीत दीप सिद्धू सनी देओल यांचा प्रभारी म्हणून निवडणुकीत दिसत होता. अभिनेता धर्मेंद्र यांनी देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर पोस्ट टाकली होतील, मात्र सनी देओल अडचणीत येताच त्यांनी या पोस्टशी माझा संबंध नसल्याचं म्हटलं होतं. दुसऱ्या बाजूला सनी देओलने देखील याच विषयापासून दूर ठेऊ लागला होता. तोच कित्ता त्याने पुन्हा गिरवला असून आपला दीप सिद्धू’शी कोणताही संबंध नसल्याचं म्हणत हात झटकले आहेत.
I am extremely in pain to see the suffering of my farmer brothers . Government should do something fast . pic.twitter.com/WtaxdTZRg7
— Dharmendra Deol (@aapkadharam) December 11, 2020
‘आज लाल किल्ल्यावर जे घडलं ते पाहून मन खूपच दु:खी झालं. मी अगोदरही ६ डिसेंबर रोजी ट्विटरच्या माध्यमातून हे स्पष्ट केलंय की माझा किंवा माझ्या कुटुंबीयांचा दीप सिद्धू याच्यासोबत कोणताही संबंध नाही’ असं ट्विट सनी देओल यांनी केलंय.
आज लाल क़िले पर जो हुआ उसे देख कर मन बहुत दुखी हुआ है, मैं पहले भी, 6 December को ,Twitter के माध्यम से यह साफ कर चुका हूँ कि मेरा या मेरे परिवार का दीप सिद्धू के साथ कोई संबंध नही है।
जय हिन्द— Sunny Deol (@iamsunnydeol) January 26, 2021
News English Summary: In 2019, Sunny Deol had contested the Lok Sabha elections from Gurdaspur constituency in Punjab. Sunny Deol had also won this election due to the overwhelming votes cast by the people. In the same election, Deep Sidhu was seen in charge of Sunny Deol. Actor Dharmendra may have also posted on social media in support of farmers, but when Sunny Deol got into trouble, he said that he had nothing to do with the post. Sunny Deol, on the other hand, had also started keeping away from the same subject. He has re-mortgaged the same lot and has shaken hands saying that he has nothing to do with Deep Sidhu.
News English Title: Violence in tractor rally BJP MP Sunny Deol reacts to violence at red fort distances himself from Deep Sidhu News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल