हिंदू महिलांचे बिगर-हिंदू विवाह | लव्ह जिहादविरोधी कायद्यासाठी व्हीएचपी-RSS'चा दबाव
भोपाळ, १९ सप्टेंबर : तिहेरी तलाकावर कायदा करणाऱ्या मोदी सरकार पुढे हिंदू महिलांना वाचवण्याचे नवे आव्हान आहे. विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) बिगर-हिंदू विवाहाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवणार आहे. हिंदुवादी संघटना अशा घटनांना लव्ह जिहाद म्हणतात. याला आळा घालण्यासाठी व्हीएचपी मोदी सरकारवर कायदा आणण्याचा दबाव टाकत आहे. भोपाळ येथे दोन दिवसीय व्हीएचपी बैठकीच्या दुसर्या दिवशी शुक्रवारी एका अहवालावर चर्चा झाली. आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनीही यात भाग घेतला होता.
या अहवालात हिंदू महिलांनी बिगर हिंदूंवर, विशेषत: मुस्लिम तरुणांशी विवाह केल्याच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित केले आहे. हिंदू महिलांना फसवून मुस्लिम तरुणांशी केलेल्या लग्नाला लव्ह जिहाद म्हटले जाते. त्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे. मुस्लिम तरुण हिंदू स्त्रियांशी नाव बदलून संपर्क करतात आणि लग्न होईपर्यंत वास्तव लपवतात. बर्याच प्रकरणांमध्ये लग्नानंतर महिलांवर अमानुष छळ केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.
दरम्यान सध्याच्या कायद्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ सारखी काही टर्मच नाही. ‘लव्ह जिहाद’ची परिभाषाच नाही आणि ‘लव्ह जिहाद’शी संबंधित एकही प्रकरण सरकारपर्यंत आलेलं नाही, असा खुलासा केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला. ४ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना रेड्डी यांनी हा खुलासा केला होता.
लव्ह जिहाद शब्दाची सध्याच्या कायद्यात परिभाषा करण्यात आलेली नाही. तसेच लव्ह जिहादचं एकही प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांपर्यंत आलेलं नाही, असं सांगतानाच एनआयएने केरळमधील दोन वेगवेगळ्या धर्मांशी निगडीत प्रकरणाचा तपास केल्याचंही रेड्डी यांनी सांगितलं होतं. तसेच संविधानाने कोणताही धर्म स्वीकारण्याचं त्याचा प्रचार-प्रसार करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे, असंही ते म्हणाले होते.
News English Summary: The Modi government, which has enacted a law on triple divorce, has a new challenge to save Hindu women. The Vishwa Hindu Parishad (VHP) will launch a nationwide campaign to curb the rising incidence of non-Hindu marriages. Hindu organizations call such incidents love jihad.
News English Title: Vishwa Hindu Parishad will pressurize PM Narendra Modi government make law to stop love jihad Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO