27 December 2024 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

आपण कोरोनाची दुसरी लाट बोलतोय, पण खरंतर ही त्सुनामी आहे - दिल्ली हायकोर्ट

Oxygen Express

नवी दिल्ली, २४ एप्रिल: देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते. मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला.

दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे मृत्यूचं तांडवच सुरू आहे. २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं दिल्ली हादरलेली असतानाच दिल्लीत नाशिकच्या घटनेच्या स्मृती जाग्या करणारी घटना घडली आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने एकाच रुग्णालयातील २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, ऑक्सिजन पुरवठ्यामुळे होत असलेल्या मृत्यूंची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण केल्यास आम्ही त्याला थेट लटकवू, असा गर्भित इशारा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विपीन सांघी आणि न्यायाधीस रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली आहे. महाराजा अग्रसेन रुग्णालयाच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

रुग्णालयात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजनचा साठा नसल्याने रुग्णालयाने कोर्टात धाव घेतली होती. त्यावर कोर्टाने ही टिप्पणी केली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कोण रोखत आहे ते सांगा. जर कोणी ऑक्सिजनचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला लटकवू, असं कोर्टाने दिल्ली सरकारला सांगितलं. तसेच आपण कोरोनाची दुसरी लाट बोलतोय, पण खरंतर ही त्सुनामी आहे असं देखील हायकोर्टाने नमूद केल्याने गंभीर समोर आलं आहे.

आम्ही कुणाला सोडणार नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. स्थानिक प्रशासनाच्या अशा अधिकाऱ्यांची तक्रार तुम्ही केंद्राकरडे करा. म्हणजे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं कोर्टाने दिल्ली सरकारला सांगितलं. दिल्लीसाठी दिवसाला 480 मॅट्रीक टन ऑक्सिजन देण्यात येणार आहे. ऑक्सिजनचा हा साठा दिल्लीला कधी मिळणार आहे? असा सवालही कोर्टाने केला.

तुम्ही (केंद्राने) आम्हाला 21 एप्रिल रोजी दिल्लीला रोज 480 मॅट्रिक टन ऑक्सिजन देणार असल्याचं सांगितलं होतं. हे ऑक्सिजन कधी मिळणार ते सांगा? असा सवाल कोर्टाने केला. त्यावर गेल्या काही दिवसांपासून राज्याला केवळ 380 मॅट्रिक टन ऑक्सिजन मिळत आहे. शुक्रवारी तर सुमारे 300 मॅट्रिक टन ऑक्सिजन मिळालं होतं, असं दिल्ली सरकारने सांगितल्यानंतर कोर्टाने केंद्राला हा सवाल केला.

 

News English Summary: We will not release anyone,” the court said. Report such officials of local administration to the Center. That means they will be dealt with severely, the court told the Delhi government. For Delhi, 480 metric tonnes of oxygen will be provided daily. When will Delhi get this supply of oxygen? The court also asked such a question.

News English Title: We are calling it wave but it is actually tsunami said Delhi High court on surging COVID cases in India news updates.

 

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x