16 April 2025 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

पेट्रोल पंपांवरील मोदींचे होर्डिंग हटविण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

ECI directs, petrol pumps, remove hoardings, Prime Minister

कोलकत्ता , ०४ मार्च: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने या राज्यांमधील सर्व पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेले बॅनर हटवण्याचे आदेश दिले आहेत. पीटीआयने विश्वासू सूत्रांच्या आधारे याबाबत माहिती दिली आहे.

तृणमूल काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून हा आदेश देण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसने करोना लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करण्यावरुन आक्षेप नोंदवला होता. निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांसोबतच करोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरण्यात आलेला मोदींचा फोटोही ७२ तासांत हटवण्यास सांगितलं आहे.

दरम्यान सोमवारी भारतीय जनता पक्षानेही तृणमूल काँग्रेसविरोधात निवडणूक आय़ोगाकडे धाव घेत आचारसंहिता लागू झालेली असतानाही पश्चिम बंगालमधील दोन मंत्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासन देत असल्याचा आरोप केला होता.

 

News English Summary: West Bengal, Tamil Nadu, Kerala, Assam and Puducherry are all set to go to the polls. Against this backdrop, the Election Commission of India has ordered the removal of banners with photos of Prime Minister Narendra Modi on all petrol pumps in these states. PTI has given information about this on the basis of reliable sources.

News English Title: West Bengal Assembly Election 2021 ECI directs petrol pumps to remove hoardings carrying photographs of Prime Minister within 72 hours news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#ElectionCommission(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या