23 December 2024 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात
x

भाजपा फ्रॉड पार्टी, आम्ही चुकलो | प. बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून गावभर फिरून जनतेची माफी

CM Mamata Banerjee

कोलकाता , १३ जून | भारतीय जनता पक्षाचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला आणि भारतीय जनता पक्षाचे तारे फिरल्याचे पाहायला मिळतंय. त्यात भाजपमध्ये निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करणारे मोठे नेते आणि सामान्य कार्यकर्ते सुद्धा स्वगृही परतू लागले आहेत. मात्र तत्पूर्वी देखील ते भाजपाला दोष देत स्वतःच्या चुका मान्य करून गावागावात माफी मागत फिरत आहेत.

काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत आहेत. बीरभूम जिल्ह्यातल्या लाभपूर, बोलपूर, सैथिया तसंच हुगली जिल्ह्यातल्या धनियाकली या गावांमधून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा सार्वजनिक माफीनाम्याचा कार्यक्रम केला आहे. परंतु, भारतीय जनता पक्षाचा असा आरोप आहे की या सार्वजनिक माफिनाम्यामागे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची चाल आहे. त्यांनी या कार्यकर्त्यांना घाबरवलं आणि धमकावलं असणार आहे.

या माफिनाम्यामध्ये सांगण्यात आलं की भाजपाने गोड बोलून गळ घातली होती पण तो पक्ष फ्रॉड आहे. आमच्याकडे ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि आम्ही त्यांच्या विकास कार्यक्रमाचा भाग व्हायलाच हवं. मुकूल मंडल नावाच्या एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने सांगितलं की, मी भारतीय जनता पक्षाला ओळखायला चुकलो. मला तृणमूलमध्ये परत जायचं आहे. सैथियामध्ये तर भारतीय जनता पक्षाचे ३०० कार्यकर्ते शपथ घेतल्यानंतर तृणमूलमध्ये परतले.

 

News Title: West Bengal BJP party Workers on streets for public apology and said they want to join TMC party news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x