23 December 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात
x

फोन रेकॉर्ड केले जातात | त्यामुळे मी शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू शकत नाही - ममता बॅनर्जी

CM Mamata Banerjee

कोलकाता, २१ जुलै | पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्रावर जोरदार टीका करताना, देशाला प्लास्टर करण्याची गरज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त केलेल्या संबोधनादरम्यान व्यक्त केली. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे. केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत ‘खेला’ होणार, असे आव्हानच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे.

तसेच केंद्र सरकार हेरगिरीसाठी करदात्याचा पैसा खर्च करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहीद दिन समारंभाचे तृणमूलच्या वतीने देशभरात प्रसारण करण्यात आले. देशपातळीवर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तृणमूलच्या रणनितीचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सर्वांचे फोन रेकॉर्ड केले जात आहेत. ते ऐकले जात आहे. मी ओडिशाचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्याशी बोलू शकत नाही. सरकारी पैशाचा वापर हेरगिरीसाठी केला जात आहे. पेगाससने न्यायाधीश, मंत्री, आमदार, खासदार सर्वांचे फोन ताब्यात घेतलेत. लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. माझा फोन टॅप केला जात आहे असं त्यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: West Bengal Chief Minister Mamta Banerjee target Modi govt on phone tapping news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x