11 January 2025 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch
x

GDP'चा अर्थ गॅस-डीझेल-पेट्रोल असा झालाय | २०२४ मधील निवडणुकीत मोदी विरुद्ध देश असेल - ममता बॅनर्जी

CM Mamata Banerjee

नवी दिल्ली, २८ जुलै | प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. १० जनपथ मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधीही तेथे उपस्थित होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा पहिला दिल्ली दौरा आहे. जीडीपीचा अर्थ गॅस-डीझेल-पेट्रोल असा झाला आहे. संपूर्ण देशात आता खेला होबे होणार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी विरुद्ध देश असा सामना होणार आहे”, असं ममता बॅनर्जी यांनी भेटीनंतर सांगितलं.

सोनिया आणि केजरीवाल यांच्याशी भेट होणार आहे. लालू यादव यांच्याशीही चर्चा झाली आहे. सर्वजण एकत्र येऊ इच्छित आहेत. सोनिया गांधी देखील विरोधी पक्षांनी एकत्र यावं या भावनेच्या आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल. विरोधी पक्ष म्हणून सर्वजण एकत्रितरित्या गांभीर्यानं काम करू लागलो तर येत्या ६ महिन्यांत याचे परिणाम दिसू शकतात”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

देशातील सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. जर येत्या काळात राजकीय वादळ निर्माण झालं तर त्याला कुणीच थांबवू शकत नाही. खेला होबेचा नाद आता संपूर्ण देशात घुमणार आहे. आतापर्यंत अच्छे दिनची वाट खूप पाहिली आता आम्हाला सच्चे दिन पाहायचे आहेत, असंही त्या म्हणाल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: West Bengal CM Mamata Banerjee meet congress interim president Sonia Gandhi at Delhi news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x