23 February 2025 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने प. बंगालमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन

West Bengal Government, Lockdown

कोलकाता, २४ जून : देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन जारी असताना पश्चिम बंगालमध्ये आणखी ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत घोषणा केली आहे. मात्र लॉकडाूनच्या या टप्प्यात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

या नव्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत रेल्वे सेवा आणि मेट्रो पूर्णपणे बंद राहतील. याशिवाय शाळा, कॉलेजदेखील बंद राहणार आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या यादीत पश्चिम बंगाल राज्य सातव्या क्रमांकावर आहे. या राज्यात आतापर्यंत एकूण 14 हजार 728 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 580 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला.

कोलकत्त्यातील निबान्ना येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही यावेळी चर्चा झाली. तसेच राज्यातील लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

 

News English Summary: The lockdown has been extended till July 31 in West Bengal as the outbreak of corona is on the rise across the country. Chief Minister Mamata Banerjee has announced this. However, some concessions have been made in this phase of lockdown.

News English Title: West Bengal Government Announces Extension Of Lockdown Till July 31 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x