14 January 2025 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

प. बंगाल | आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडे उमेदवाराचं नसल्याने तृणमूलची फोडाफोडी

West Bengal, Assembly election, TMC party, Amit Shah

कोलकत्ता, १९ डिसेंबर: पुढील वर्षी म्हणजे एप्रिल-मे 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधीच आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील एकूण 294 पैकी तब्बल 200 जागा जिंकण्याचा निर्धार अमित शाहांनी केला आहे. एकीकडे बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर, त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने शेजारील पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस 219 जागांसह सत्तेत आहे. बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 इतका आहे. 2021 मध्ये इथे निवडणुका होत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर शुक्रवारी रात्रीच दाखल झाले असून आज मेदिनीपूर येथील सभेद्वारे त्यांनी तृणमूल काँग्रेसला तगडा झटका दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ‘योद्धा’ अशी ओळख असलेले माजी मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. व्यासपीठावर अमित शहा यांच्या बाजूलाच त्यांना स्थान देण्यात आलं होतं. सुवेंदू यांच्यासह पश्चिम बंगालमधील ९ विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षात सहभागी झाले असून त्यात तृणमूलच्या ५ आमदारांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले,”आज सर्व पक्षांतील चांगले लोक भाजपात दाखल झाले आहेत. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल असं अमित शहा म्हणाले.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार भारतीय जनता पक्षाकडे पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराचं नसल्याने तृणमूल आणि इतर अपक्ष उमदेवारांना मोठी अमिश दाखवून भाजपमध्ये प्रवेश देत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाषेबद्दल देखील कडवटपणा असून मोदी-शहांची नेमकी तीच अडचण निवडणुकीतील प्रचारात होणार आहे. दक्षिणेतील निवडणुकांमध्ये मोदी-शहांना मंचावर अक्षरशः ट्रान्स्लेटर ठेवावे लागले होते. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या आडून हवा निर्मिति केली जात असल्याचं स्थानिक माध्यमं सांगतात. परंतु जमिनीवरील वास्तव पूर्ण वेगळं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

 

News English Summary: West Bengal Assembly elections are being held in April-May 2021. Even before that, the demolition has already started. Amit Shah has decided to win 200 out of 294 seats in West Bengal. On the one hand, after the victory in Bihar, at the same time, the Bharatiya Janata Party started strategizing to conquer neighboring West Bengal. In Bengal, Mamata Banerjee’s Trinamool Congress is currently in power with 219 seats. The majority in Bengal is 148. Elections are taking place here in 2021.

News English Title: West Bengal politics started before assembly election against TMC news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x