27 December 2024 7:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

ही कसली घमेंड आहे, की तुम्ही लोकांसमोर स्वतःच अपयश स्वीकारण्यास तयार नाही - नरेंद्र मोदी

India corona pandemic

नवी दिल्ली, ३० एप्रिल | देशात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत असताना दिसत आहे. गुरुवारी पहिल्यांदा एका दिवसात 3 लाख 86 हजार 854 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसाच्या आत मिळालेल्या नवीन रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. यापूर्वी 28 एप्रिलला सर्वात जास्त 3.79 लाख रुग्णांची ओळख झाली.

जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील 17 देशांमध्ये भारतीय विषाणूचा स्ट्रेन आढळून आला असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने याला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ (VOI) घोषित केले असून B.1.617 या डबल म्यूटेंट व्हेरिएंटमुळेच भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत असल्याचा दावा केला आहे.

जगात आतापर्यंत 15 कोटींपेक्षा जास्त लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात सापडले असून यामध्ये 31.63 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भारतातील स्थिती अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे कोरोना संबंधित औषधं, लस ते ऑक्सिजन अशा सर्वच महत्त्वाच्या गोष्टीचं नियंत्रण आणि वितरण केंद्र सरकारने स्वतःकडे ठेवल्याने देशात गोंधळ अजूनच वाढला आहे आणि लांबलचक प्रशासकीय कामांमुळे राज्य सरकारकडे त्या महत्वाच्या गोष्टी पोहोचण्यास अजून विलंब होतं आहे. सध्या देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे आणि दुसऱ्या बाजूला लाखो रुग्ण मृत्युमुखी पडल्याने स्मशान भूमीत देखील वेटिंग असल्याचं पाहायला मिळतंय.

सध्याच्या गंभीर परिस्थितीला मोदी सरकारच जवाबदार असल्याचं देशभरात म्हटलं जातंय तर त्यासाठी #ResignModi #ModiMustResign असे हॅशटॅग समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. मात्र देशात परिस्थिती अत्यंत भीषण होऊन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच अपयश मान्य करायला तयार नाही आणि हा मोदींचा ‘घमेंड’ असल्याची टीका सुरु झाली आहे. मात्र सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी याच शब्दाचा उपयोग करून तत्कालीन युपीए सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हटलं होतं की, “ही कसली घमेंड आहे, की तुम्ही लोकांसमोर स्वतःच अपयश स्वीकारण्यास तयार नाही”. आता तेच १४ जुलै २०१३ मधील मोदींच ट्विट समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे.

 

News English Summary: Before coming to power, Modi had used the same term to castigate the then UPA government, saying, “What an arrogance that you are not ready to admit failure in front of the people.” Now, Modi’s tweet dated July 14, 2013 is going viral on social media.

News English Title: What arrogance is this That you are not willing to accept your failure in front on the people said Narendra Modi in 2013 news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x