पुदुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का | अल्मपतात आलेले पुदुचेरीतील सरकार अखेर कोसळले
पाँडिचेरी, २२ फेब्रुवारी: पॉंडिचेरीमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ६ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अल्मपतात आलेले पुदुचेरीतील काँग्रेस सरकार अखेर कोसळले आहे. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना आज (२२ फेब्रुवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे हे सरकार पडणार, हे निश्चित होते. त्यामुळे व्ही. नाराणसामी आणि काँग्रेसच्या आमदारांनी बहुमत चाचणीआधीच सभात्याग केला. तत्पूर्वी व्ही. नारायणसामी यांनी आपल्या शेवटच्या भाषणात काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर शरसंधान साधले आहे.
मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले आहे.पाँडिचेरी विधानसभेत काँग्रेसला आपले बहुमत सिद्ध करता आले नाही. सोमवारी सभापतींनी जाहीर केले की सरकारकडे बहुमत नाही. यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचा निरोप निश्चित झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे विधानसभेत काँग्रेसकडे ९ आमदारांसह २ डीएमके आणि एक अपक्षाचा पाठिंबा आहे.
व्ही. नारायणसामी यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर पुदुचेरीची विधानसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. काँग्रसचे आमदार लक्ष्मीनारायण आणि डीएमकेचे आमदार वेंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यापूर्वी काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला होता. या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे 33 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून 11 झाली आहे. तर विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या 14 झाली होती.
एप्रिल-मे दरम्यान विधानसभा निवडणूक:
या सगळ्या उलथापलथीनंतरही मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी सरकार बहुमतात असल्याचा दावा केला होता. एप्रिल-मे महिन्यात पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापूर्वी तिथे मोठ्या राजकीय हालचाली होताना पाहायला मिळत आहेत. पुद्दुचेरी विधानसभेत काँग्रेसचे 10, DMK 3, ऑल इंडिया एन आर काँग्रेस 7, AIDMK 4, भाजप 3 तर 1 अपक्ष आमदार आहे. काँग्रेसच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर एक आमदार अपात्र ठरला होता. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 15 आहे.
News English Summary: In Pondicherry, the Congress has suffered a major blow. The Congress government in Puducherry, which came to a standstill due to the resignation of 6 MLAs, has finally collapsed. Chief Minister V. Narayanasamy failed to prove his majority in the Assembly today (February 22) during a vote of confidence. With the resignation of six Congress MLAs, it was certain that this government would fall. Therefore, V. Naranasamy and Congress MLAs resigned before the majority test. Before that V. In his last speech, Narayanasamy slammed the Congress rebel MLAs.
News English Title: What is happening In Puducherry now is Political Prostitution Says Chief Minister Narayanasamy news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या