20 April 2025 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

पुलवामा हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला? - राहुल गांधी

MP Rahul Gandhi, CRPF Attack

नवी दिल्ली: पुलवामा येथे सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेला आज वर्ष पूर्ण झालं. भारतीय सैन्याच्या तब्बल ४० जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या विदारक घटनेचे व्रण प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजे आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.

काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या निमित्तानं पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिलीय. परंतु, सोबतच त्यांनी मोदी सरकारला काही बोचरे प्रश्नही विचारलेत. यामध्ये त्यांनी सुरक्षेतील घोडचुकीसाठी मोदी सरकारमध्ये कुणाला जबाबदार धरण्यात आलं? असा प्रश्न विचारलाय. राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत सोशल मीडियाद्वारे हे प्रश्न विचारलेत. ‘ आज जेव्हा आपण सगळे पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांचं स्मरण करत आहोत, तेव्हा आपल्याला हेदेखील विचारायला हवं…

२. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत काय आढळलं?

३. सुरक्षेतील ढिसाळपणाबद्दल मोदी सरकारमध्ये कुणाला जबाबदार धरण्यात आलं?’

तर दुसरीकडे उमेश गोपीनाथ जाधव यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मूळ गावी जाऊन तेथील माती जमा केली आहे. यासाठी त्यांना संपूर्ण देशात तब्बल ६१ हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे. गेल्याच आठवड्यात जाधव यांचा प्रवास संपला या प्रवासाला जाधव मोठ्या अभिमानाने ‘तीर्थ यात्रा’ असं संबोधतात. प्रत्येक जवानाच्या गावी जाऊन येथील माती एका कलशामध्ये जमा करुन सर्व कलश एकत्र करुन जाधव श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

तत्पूर्वी सीआरपीएफने गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यानंतर एक ट्विट केलं होतं. ‘आम्ही विसरणार नाही, आम्ही माफ करणार नाही. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना अभिवादन करतो आणि आपल्या शहीद बांधवांच्या कुटुंबियांसमवेत आम्ही उभे आहोत. या भयंकर हल्ल्याचा बदला घेतला जाईल’ असं ट्विटमध्ये म्हटलं होतं.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष लोटलं. या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्यानं अवघा देश हादरला, मात्र वर्ष उलटूनही काही शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अक्षरश: हेलपाटे घालावे लागत आहेत. शहिदांच्या कुटुंबीयांना अनेक आश्वासनं देण्यात आली होती, मात्र त्यांची पूर्तता अद्यापही झाली नाही.

 

Web Title: Who benefited the most from the attack asked Congress MP Rahul Gandhi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या