15 January 2025 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

राजकीय फायद्यासाठी उटसूट सर्जिकल स्ट्राईक; बलात्काऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक का सुचत नाही?

PM Narendra Modi, Rapes in India

उन्नाव: सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये घडली. स्थानिक न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना सकाळच्या सुमारास पाच तरुणांनी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पीडितेच्या वडिलांनी पोलिसांनी दिली.

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले. पीडित महिला जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं. यावेळी काही जणांनी पीडितेची मदत करण्यासाठी धाव घेतली. परंतु, आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिकांनी फोन करुन घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (UNNAO: Four people have been arrested in connection with the case, main accused Shivam Trivedi is still absconding)

पीडिता आज पहाटे ४ वाजता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात असताना ही घटना घडली. गौरा फाट्यावर गावातील हरिशंकर त्रिवेदी, किशोर शुभम, शिवम, उमेश यांनी पीडितेला घेरले आणि तिच्या डोक्यावर काठी आणि गळ्यावर चाकूने वार केले. दरम्यान, चक्कर आल्याने पीडिता खाली कोसळली. त्यानंतर या सहा जणांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, अशी माहिती पीडितेने दिली आहे.

एकाबाजूला लेकीचं जगणंच असल्या हैवानांपुढे कठीण झालेलं असताना देश पातळीवरील सरकार यावर कोणताही तातडीने निर्णय घेऊन उपाय योजना आखण्याची धमक दाखवताना दिसत नाही. केवळ राजकीय फायद्यांसाठी उठसूट सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या भाजप सरकारला क्रूर बलात्काऱ्यांना तातडीने धडा शिकवता येईल असा कोणताही कायदा करण्याची धमक नाही. त्याच मूळ कारण याच्या पक्षातीलच अनेक नेते मंडळी बलात्काराच्या आरोपाखाली आहेत आणि स्वतः भाजपचे वरिष्ठ नेतेच महिलांसंबंधित गुन्ह्यात सामील असणाऱ्या नेत्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. दोन दिवस आधी झारखंडच्या निवडणुकीसाठी स्वतः मोदींनी ज्या उमेदवाराचा प्रचार केला ती व्यक्ती एका महिला शिक्षिकेच्या खुनातील आरोप आहे आणि त्यासंबंधित वृत्त सर्वत्र फोटोसहित प्रसिद्ध झाली आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x