राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली | मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?
नवी दिल्ली, ०३ मार्च: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १७७५ ते १९७७ या दरम्यान २१ महिने देशांतर्गत आणीबाणी लावली होती. इंदिरा गांधींचा तो निर्णय भारतीय राजकारणातील वादग्रस्त पान आहे. भाजपसह काँग्रेसचे सर्व विरोधक या निर्णयावर आजही टीका करत असतात. काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांनी या विषयावर त्यांच मत प्रदर्शित केलं आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक आणि देशाचे माजी आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांना राहुल गांधी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना आणीबाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
आणीबाणी लावणं चूक होती आणि त्या काळात जे काही घडलं तेदेखील चुकीचं होतं असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. प्रसिद्द अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करत असताना राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे. “काँग्रेसकडून आणीबाणी लागू करणं एक चूक होती, पण पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही,” असं राहुल गांधींनी यावेळी म्हटलं. राहुल गांधी यांनी आणीबाणी चुकीची होती सांगताना सध्या देशात जे सुरु आहे ते आणीबाणीपेक्षा वेगळं आहे अशी टीका केंद्र सरकारवर केली.
“मला वाटतं ती (आणीबाणी) एक चूक होती. नक्कीच ती चूक होती. पण आणीबाणीच्या काळात जे काही झालं आणि सध्या जे काही सुरु आहे त्यात मुलभूत फरक आहे. काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी आपल्याला परवानगीदेखील नाही. आपली इच्छा असली तरी आपण करु शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीबद्दल राहुल गांधींनी माफी मागणं यात आम्हाला गैर वाटत नाही. राहुल यांनी मनाचा मोठेपणा दाखवून चूक स्वीकारली. इंदिरा गांधींनी केलेल्या चुकीची त्यांनी कबुली दिली. आता ग्रोधा दंगलीबद्दल गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची माफी मागणार का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला आहे.
News English Summary: Former Prime Minister Indira Gandhi had declared a 21-month state of emergency between 1775 and 1977. That decision of Indira Gandhi is a controversial page in Indian politics. All Congress opponents, including the BJP, are still criticizing the decision. Congress leader and Indira Gandhi’s grandson Rahul Gandhi has expressed the same view on the issue. Rahul Gandhi has recently given an interview to Kaushik Basu, a professor at Cornell University in the US and a former economic adviser to the country. In this interview, he was asked about the emergency.
News English Title: Will Prime Minister Narendra Modi accept his mistake of Gujarat riots asks congress leader Nana Patole news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO