6 January 2025 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

मध्य प्रदेश | कोरोना रुग्ण महिलेवर इस्पितळात बलात्कार, रुग्ण महिलेचा दुसऱ्या दिवशी मृत्यू

India corona pandemic

भोपाळ, १३ मे | मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळमधील मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (BMHRC) मध्ये कोरोना संक्रमित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अत्याचारानंतर महिलेची तब्येत अचानक बिघडली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. आता तब्बल एका महिन्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या काजी कॅम्प परिसरात राहणाऱ्या महिलेवर 6 एप्रिलला BMHRC मध्ये अत्याचार झाला. महिलेने घडलेला प्रकार हॉस्पिटलच्या नर्सला सांगितला. यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना बोलवले. पोलिसांनी कलम-376 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आणि आरोपीला तुरुंगात पाठवले. धक्कादायक म्हणजे, पोलिस किंवा हॉस्पिटलने एका महिन्यानंतरही कुटुंबियांना अत्याचाराच्या घटनेची माहिती दिली नव्हती.

3 किंवा 4 एप्रिला भोपाळ मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पीडित महिलेला भरती करण्यात आले होते. 6 एप्रिलला सकाळी चार वाजता आरोपी सफाई कर्मचारी महिलेच्या रुममध्ये आला आणि चेपअप करण्याच्या बहाण्याने महिलेच्या शरीरावर आणि प्रायवेट पार्टवर स्पर्श करू लागला. यावेळी महिलेने विरोध करताच आरोपीने पळ काढला. या घटनेनंतर महिलेने हा सर्व प्रकार हॉस्पिटलच्या कृष्णा बाई यांना सांगितला आणि त्यांनी नर्सिंग स्टाफ सिस्टर जिंसी यांना माहिती दिली. दरम्यान, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी महिलेची अचानक तब्येत बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.

 

News English Summary: A shocking incident has come to light from Bhopal, the capital of Madhya Pradesh. A woman infected with corona has been tortured at the Memorial Hospital and Research Center (BMHRC) in Bhopal. After the atrocity, the woman’s health suddenly deteriorated and she died the next day. Now, a month later, the incident has come to light.

News English Title: Woman infected with corona has been tortured at the Memorial Hospital and Research Center in Bhopal news updates.

हॅशटॅग्स

#MadhyaPradesh(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x