22 December 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

इंदिराजींचं स्वप्न | वाजपेयींची घोषणा | सोनियाजींच्या हस्ते भूमिपूजन | मोदीजींच्या हस्ते लोकार्पण

Worlds longest highway tunnel, Horseshoe shaped, Atal tunnel, PM Narendra Modi

मनाली, ३ ऑक्टोबर : अटल बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. १९७२ मध्ये माजी आमदार लता ठाकूर यांनी सहा महिने बर्फात अडकून पडण्याच्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी बोगदा निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर सन २००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले मित्र टशी दावा ऊर्फ अर्जुन गोपाल यांच्या निमंत्रणावरुन केलांग येथे जाऊन रोहतांग बोगद्याच्या उभारणीची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर २८ जून २०१० मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी बोगद्यासाठी १,३५५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.

हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ या बोगद्याचे आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या युद्धनीती विषयक धोरणाचा हा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा असून भारतीय लष्कराला त्यामुळे पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे.

पीरपंजाल डोंगररांगांना भेदून ३,३०० कोटी रुपये खर्चून हा बोगदा बनवण्यात आला आहे. हा बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवर (१०,०४० फूट) बनवण्यात आला आहे. या बोगद्याच्या लोकार्पणानंतर लाहौल येथील जनता आता थंडीच्या दिवसात हिमवृष्टी सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत जगापासून संपर्काविना राहणार नाही. या बोगद्यामुळे चीनला लागून असलेल्या लडाख आणि पाकिस्तानला लागून असलेल्या कारगिलपर्यंत भारतीय सैन्याला सहज पोहचता येणार आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचं अंतर ४६ किमीने कमी होणार आहे. त्यामुळे केवळ दीड तासात मनाली ते केलांगपर्यंत पोहोचता येणार आहे. या बोगद्यामुळे या भागातील पर्यटनालाही गती मिळणार आहे.

दररोज 3000 कार आणि 1500 ट्रकची वाहतूक झेलण्याची क्षमता या टनलमध्ये आहे. हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनाइजेशन (BRO) ने बांधला आहे. मनाली लेह हायवेवर रोहतांग, बारालचा, लुंगालाचा ला आणि टालंग ला असे पास आहेत. बर्फवृष्टीमध्ये येथे जाणे कठीण असते. आधी मनालीपासून सिस्सू पोहोचण्यासाठी 5 ते 6 तास लागत होते. आता हे अंतर काही मिनिटांवर आले आहे. अटल टनेलच्या शेवटच्या 400 मीटरसाठी स्पीड लिमिट 40 किमी आहे. उर्वरित अंतरासाठी 80 किमी प्रति तास वेग ठेवण्यात आला आहे. बोगद्याच्या दोन्ही तोंडावर प्रवेश करण्याआधी अडथळे लावण्यात आलेले असणार आहेत. तर प्रत्येक 150 मीटरवर टेलिफोन ठेवण्यात येणार आहेत.

बोगद्यामध्ये प्रत्येक 60 मीटरवर फायर हायड्रेंट तंत्रज्ञान आहे, आग लागल्यास लगेचच नियंत्रण मिळविण्याची व्यवस्था आहे. 250 मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरा असून ते ऑटो इन्सिडेंट डिटेक्शन करतात. प्रत्येक किमीवर हवेची गुणवत्ता तपासणी आणि शुद्ध हवा आत घेण्याची सुविधा आहे. प्रत्येक 25 मीटरवर सूचना लावण्यात आल्या आहेत. संपूर्ण टनेल ब्रॉडकास्टिंग सिस्टिमने लेस आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi today inaugurated the strategically important, all-weather Atal Tunnel in Himachal Pradesh that connects Manali to the Lahaul-Spiti valley and reduces travel time to Leh (in the Union Territory of Ladakh) by up to five hours. Described as the longest highway construction of its kind in the world (above 10,000 feet), the 9.02 km-long Atal Tunnel is built to “ultra-modern specifications” at an altitude of 3,000 meters (10,000 feet) in the Pir Panjal range of Himalayas. It is a horse shoe-shaped, single-tube, double lane tunnel with a roadway of eight meters and has an overhead clearance of 5.525 meters, the Prime Minister’s Office said in a statement.

News English Title: World longest highway tunnel horseshoe shaped 10 things about Atal tunnel Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x