18 November 2024 8:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

महाराष्ट्रात भाजपचं शिवभोजन थाळीवरून राजकारण | तर यूपीत रुग्णांच्या जेवणात किडे

Shivbhojan Thali

हमीरपूर, २४ एप्रिल: महाराष्ट्रात शिवसभोजन थाळीवरून भारतीय जनता पक्षाचं राजकारण आणि टीका काही नवा विषय राहिलेला नाही. कोरोना आपत्तीत आणि निर्बंध लागलेले असताना दारिद्र्य रेषेखालील गरीब लोकांना याचा मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळलं. मात्र या शिवभोजन थाळीचं राजकारण महाराष्ट्रात भाजप नेत्यांच्या नेहमीच केंद्रस्थानी राहिलेलं आहे. मात्र आता भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात गरिबांना आणि कोरोना रुग्णांना किती नित्कृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं याचा पुरावा समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातल्या हमीरपूर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रग्णांना निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यात आलं. भाजी आणि डाळीत किडे आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्ण संतापले. त्यांनी जेवण फेकून देत गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सीएमओनं प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हमीरपूर जनपदच्या सुमेरपूरमध्ये असलेल्या पॉलिटेक्निक वसतीगृहाचं रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आलं आहे. या ठिकाणी १३० कोरोना रुग्ण आहेत. काल सकाळी या रुग्णांना नाश्ता आणि चहा देण्यात आला. दुपारच्या जेवणात डाळ आणि पोळी देण्यात आली. एका रुग्णानं डाळीत पोळीचा तुकडा बुडवला. तर त्यात त्याला किडा दिसला. त्यानंतर त्यानं आरडाओरडा केला. सगळ्या रुग्मांनी त्यांच्या ताटातील डाळ आणि पोळी पाहिली. त्यातही किडे होते. यानंतर रुग्णालयात एकच गदारोळ झाला.

रुग्णांनी गोंधळ घातल्यानंतर त्यांना पुन्हा भाजी दिली गेली, मात्र त्यातही किडे सापडले. त्यामुळे रुग्ण अधिकच संतापले. सध्या सोशल मीडियावर याचे व्हिडिओ शेअर करण्यात येतं आहेत.

 

News English Summary: Corona patients, who was admitted to Covid Hospital in Hamirpur district of Uttar Pradesh, was given substandard food. Insects were found in vegetables and pulses. So the corona patient got angry. They threw food and made a mess. The video of the incident has gone viral and the CMO has ordered an inquiry into the matter.

News English Title: Worms found in pulses And vegetables in Covid hospital in Uttar Pradesh Hamirpur news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x