6 January 2025 4:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

कोरोनाची तीव्रता | तरुण मुलंही वृध्द आईवडिलांच्या कुशीत प्राण सोडत आहेत... केंद्र सरकार विरोधात रोष वाढतोय

India corona pandemic

नवी दिल्ली, २२ एप्रिल: देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. असं असतानाच दिल्ली उच्च न्यायालयानेही बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फेलावर घेत, “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असं उद्वेगाने सुनावलं आहे.

देशातील सर्वच जिल्ह्यात मृतांचा आकडा सरकारी आकड्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचे आढळून येत आहे. देशातील विविध स्मशानभूमीत जळणाऱ्या चितांवरुन याचा अंदाजा लावता येऊ शकतो. आमचा हेतू तुम्हाला घाबरवण्याचा नसून जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आहे. देशात कोरोनामुळे मरणाऱ्या लोकांची संख्या आणि सरकारी आकडा यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. दरम्यान, देशातील अनेक स्मशानभूमीतील चिता हे थंड होणाच्या आधीच विझवण्यात येत आहे. कारण, दुसऱ्या चितांवरदेखील अंत्यसंस्कार करता यायला हवे.

या फोटोमध्ये देशातील 10 शहरांतील कोरोनामुळे मरणाऱ्या लोकांचे 10 चित्रे दिसतील. जी तुम्हाला विचलित करु शकतील. परंतु, देशात कोरोना महामारीमुळे किती भवायह परिस्थिती निर्माण झाली आहे याचा अंदाजा येईल. या फोटोंमध्ये तुम्हाला आपण आपले नातेवाईक गमावल्याचे दिसतील. मृत व्यवस्थेसह सामान्य लोकांचा निराश आणि असहाय्य चेहरा दिसेल. या फोटोतील काही चित्रे आपल्याला याची जाणीव करुन देतील की, आपल्याजवळ कितीही पैसा असला किंवा आपण कितीही मोठे असलो तरी… थोडासा निष्काळजीपणा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भारी पडू शकतो.

हा फोटो पंतप्रधान मोदी यांच्या मतदारसंघ वाराणसीतील असून यामध्ये एक वयस्कर महिला आपल्या जवान मुलाला उपचार मिळावे यासाठी वणवण भटकत आहे. परंतु, त्याला रुग्णवाहिकादेखील मिळाली नाही. दुर्दैव असे की, त्या जवान मुलाने शेवटी आपल्या वयस्कर आईच्या पायात आपला शेवटचा श्वास सोडला. तर दुसऱ्या फोट पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील दृश असून येथे आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या रूग्णाच्या कुटूंबाला शेवटच्या वेळेस त्याचा चेहरा पाहायला मिळाला नाही. पुन्हा पुन्हा मृतदेह पाहून कुटुंब रडत राहिले.

 

News English Summary: The photo is of Prime Minister Modi’s constituency in Varanasi, in which an elderly woman is wandering around seeking treatment for her young son. But, he didn’t even get an ambulance. Unfortunately, that young boy finally breathed his last at the feet of his elderly mother.

News English Title: Youngster ultimately breathed his last at the feet of his elderly mother corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x