18 November 2024 2:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

काय बोलत आहेत? हिंदुस्थानचा युवक हा हिंदुस्थान नाही तर देशही घडवू शकतो: राहुल गांधी

Rahul Gandhi, Hindustan

जयपूर: सध्या राहुल गांधी यांच्या काँग्रेसमधील पुन्हा लाँचिंगचा विचार करत असताना त्यांनी पुन्हा चुका करून स्वतःचा हास्य करून घेणारी वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहेत असंच म्हणावं लागेल. भारताचा युवक हा भारतच नाही तर देशही घडवू शकतो. असं एक कुणालाही बुचकळ्यात पाडेल असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. भारत आणि देश हे दोन्ही वेगळे आहेत का? असा प्रश्न कुणालाही पडावा असंच हे राहुल गांधी यांचं वक्तव्य आहे. जयपूरमध्ये युवा आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान झालेल्या भाषणात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

युवकच देश घडवू शकतो असं त्यांना म्हणायचं असावं. मात्र आपण काय बोलतो आहोत हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. “भारताचा युवक भारतच नाही तर देश घडवू शकतो” असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. भारत हाच आपला देश आहे हे बहुदा ते विसरुन गेले. राहुल गांधी यांच्या भाषणाची ही क्लीप सध्या समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होते आहे.

२०१४ मध्ये केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर राहुल गांधी महाड येथी सभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींचं नाव न घेता विरोधी पक्षनेते ६० वर्षात काहीच प्रगती झाली नाही असं म्हणतात अशी टीका केली होती. ते एवढ्यावरच थांबले नाही तर तसंच विरोधी पक्ष काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करतोय असं जाहीरपणे सांगून मोकळे झाले होते. मात्र आपली चूक लक्ष्यात आल्यानंतर पुढे त्यांनी तोल सांभाळला होता.

त्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कॅलिफॉर्निया युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांना संबोधित केले होते. भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. परंतु, प्रश्नोत्तरावेळी राहुल गांधी चुकले आहेत. ज्यावरुन सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली गेली होती. लोकसभेतील सदस्यांची संख्या ५४५ एवढी आहे. मात्र, एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी लोकसभेतील सदस्यांची संख्या ५४६ एवढी सांगितली. या चुकीवरुन सोशल मीडियावर राहुल गांधी यांची खिल्ली उडवली गेली होती.

 

Web Title:  Youth of Hindustan can not only change Hindustan but the entire Nation says Rahul Gandhi.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x