17 January 2025 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: APOLLO Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, ब्रोकरेज बुलिश - NSE: YESBANK Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRB Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 88 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2833% परतावा - Penny Stocks 2025 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाच्या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ, तर बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत वाढणार
x

मोदी सरकारच्या कार्यकाळात तरुणांच्या बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या: NCRB अहवाल

NCRB Date, Youth suicides due to unemployment, PM Narendra Modi

नवी दिल्ली: देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०१७-१८ मधील आकडेवारी जाहीर केली आहे. नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरो ही गृह मंत्रालयातंर्गत येणारी संस्था आहे. देशभरातील गुन्हे व त्यांच्याशी निगडीत घटनांचे आकडेवारी एनसीआरबी जाहीर करते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळे वर्ष २०१८ मध्ये १२ हजार ९३६ लोकांनी आत्महत्या केली. तर, कर्ज व शेतीच्या इतर कारणांमुळे १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केली.

दुसरीकडे देशात आर्थिक मंदीसदृश्य वातावरण असल्याचं प्रतिबिंब एनसीआरबीच्या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसदेशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०१७-१८ मधील आकडेवारी जाहीर केली आहे. नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरो ही गृह मंत्रालयातंर्गत येणारी संस्था आहे. देशभरातील गुन्हे व त्यांच्याशी निगडीत घटनांचे आकडेवारी एनसीआरबी जाहीर करते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळे वर्ष २०१८ मध्ये १२ हजार ९३६ लोकांनी आत्महत्या केली. तर, कर्ज व शेतीच्या इतर कारणांमुळे १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केली.त आहे. २०१८ मध्ये दिवसाकाठी ३५ जणांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली. तर २०१७ मध्ये दर दिवशी सरासरी ३४ जणांनी बेकारीला कंटाळून जीवनयात्रा संपवली होती. २०१६ मध्ये हाच आकडा ३० इतका होता.

या अहवालात आत्महत्याग्रस्तांच्या आर्थिक स्थितीचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ६६ टक्के आत्महत्या केलेल्या लोकांचे वर्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी होते. तर २९.१ टक्के (१,३४,५१६ पैकी ३९,०८०) आत्महत्या केलेल्यांचे वार्षिक उत्पन्नाचा गट १ लाखांपेक्षा अधिक आणि ५ लाखांपेक्षा कमी या रेंजमधील आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्यांचे (३४.७ टक्के) प्रमाण आहे. त्यानंतर कर्नाटक (२३.२ टक्के), तेलंगाणा (८.८ टक्के), आंध्र प्रदेश (६.४ टक्के) आणि मध्य प्रदेश (६.३ टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो. तर पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तराखंड, मेघालय, गोवा आणि चंदीगड येथे शेतीसंबंधीत शून्य आत्महत्यांची नोंद आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशात सन २०१७ मध्ये देखील शून्य आत्महत्यांची नोंद झाली होती.

 

Web Title:  Youth suicides due to unemployment proved in Modi government NCRB data.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x