20 April 2025 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Special Recipe | असे दहीवडे बनवाल तर खातच राहाल पहा पाककृती

yummy and crunchy vada

मुंबई ३ मे | दहीवडा उत्तर भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे. नाश्त्याचा तो उत्तम स्रोत आहे . चटपटीत दही, खुसखुशीत वडे आणि रुचकर अश्या चटण्या याने हा वडा अजूनच खमंग होतो . मग बघा त्याची साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे

साहित्य:

  • १/२ कप उडदाची डाळ
  • १/४ कप मुगाची डाळ
  • मीठ चवीप्रमाणे
  • दह्याचे १ १/२ कप पात्तळ ताक
  • १ १/२ कप घट्ट दही
  • साखर २ ते ३ टीस्पून
  • मीठ १/२ ते ३/४ टीस्पून
  • १/२ टीस्पून आले पेस्ट/ किसलेले आले
  • १ टेबलस्पून धने-जिरे पूड
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चिंचेची गोड चटणी आणि पुदिन्याची तिखट चटणी (आवडीप्रमाणे)

कृती:
१. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ४-५ तास पाण्यात भिजत घाला. भिजलेल्या डाळी एकत्र करून पाणी न घालता बारीक वाटून घ्या. मीठ घालून ढवळून घ्या. मिश्रणात गरज वाटली तर अगदी किंचित (१ ते २ चमचे) पाणी घाला.
२. एकीकडे दह्याचे पात्तळ ताक करून घ्या.
३. घट्ट दही घोटून घ्या. त्यात मीठ साखर आणि आल्याची पेस्ट घाला. अगदी थोडेसे पाणी घालून थोडेसे पात्तळ करून घ्या. दही फ्रीज मध्ये ठेवून द्या.
४. कढईत तेल गरम करा. एका पातेल्यात गार पाणी घालून ठेवा.मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन रंगावर मध्यम आकाराचे वडे तळून घ्या वड्यांचा आकार खूप मोठा ठेवू नका.
५. तळलेले वडे लगेचच गार पाण्यात घाला. ३-४ च्या बॅच मध्ये वडे तळून घ्या. दुसरी बॅच तळून होईपर्यंत आधीचे वडे पाण्यातच ठेवा.पाण्यात भिजल्यावर वड्याचा रंग फिक्कट होईल आणि वडे थोडेसे फुगून आकार मोठा होईल.वडे पाण्यातून काढताना किंचित पिळून पाणी काढून टाका आणि मग हे वडे ताकात भिजत घाला.
६. साधारण तास-दोन तास वडे ताकात भिजत फ्रीज मध्ये ठेवा.
७. सर्व्ह करताना, बाऊलमध्ये ताकातले वडे ठेवा. वरती घोटून ठेवलेले दही घाला. त्यावर धने-जिरेपूड, लाल तिखट चिमटीने घाला. आवडत असल्यास चिंचेची आणि पुदिन्याची चटणी घाला.कोथिंबीर घालून थंडगार दहीवडे सर्व्ह करा.

News English Summary: Dahiwada is a popular dish in North India. It is a great source of breakfast. Spicy curd, crispy wada and delicious chutneys make this wada even more delicious. Then look at its material and action as follows

News English Title:Yummy crunchy dahiwada is best for breakfast news update article

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या