महत्वाच्या बातम्या
-
Agnipath Protests | जवानांचा अपमान सुरु | भाजपच्या कार्यालयांना वॉचमन हवा असल्यास अग्निविरांना प्राधान्य देऊ
लष्करात नव्याने भरती झालेल्या सैनिकांपैकी ७५ टक्के सैनिकांना चार वर्षांनंतर निवृत्त करण्यासाठी अग्निपथ योजनेला देशभर सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांची आणि नेत्यांची वक्तव्ये नव्या वादाचे कारण ठरली आहेत. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या वादग्रस्त विधानांवर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Agneepath Scheme | सीमेवर देशासाठी सेवा बजावणं सुद्धा कंत्राटी नोकरीचा प्रयोग? | देशभर मोदी सरकारविरोधात रोष
राष्ट्रीय सुरक्षा हा प्रयोगाचा विषय होऊ शकतो का? आज हा प्रश्न आहे कारण जवळपास दोन वर्षांनंतर लष्करात भरतीसाठी सरकारकडून काही मोठ्या घोषणा झाल्या आहेत आणि त्याचबरोबर हा प्रश्नही समांतर चालू आहे. अलिकडेच भारतीय लष्करातील नव्या भरतीच्या संदर्भात सरकारने ‘अग्निपथ’ प्रवेश योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या घोषणेमुळे देशातील अनेक भागांत युवा चळवळी सुरू झाल्या आहेत. उदाहरणार्थ, उत्तर भारतात हे आंदोलन उग्र रूप धारण करताना दिसत आहे. या तरुणांबरोबरच देशातील माजी लष्करी अधिकारीही या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Gen Bipin Rawat Chopper Crash | हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा आज तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या अपघातात हेलिकॉप्टरमधील इतर 11 अधिकारी आणि सैनिकांचाही मृत्यू झाला.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय सैन्यात 14 हजार जागांसाठी बम्पर भरती | घर बसल्या ऑनलाईन अर्ज करा
भारतीय सशस्त्र सेना आणि राज्य पोलिस दलाच्या विविध अंगांच्या 14 हजार पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी ही चांगली बातमी आहे. येथे अशा पाच भरतींबद्दल माहिती आहे, ज्यामुळे बेरोजगारांचे आयुष्य बदलू शकते. तर अशा सुमारे 14 हजार नोकर्या जाणून घ्या जिथे तुम्ही केवळ लॉकडाऊन दरम्यान अर्ज करू शकता. यावर्षी लोकांसाठी नोकऱ्यांची आवशक्यता आणखीनच वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कारगिल युद्धातील जवानांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनाने एका दिवसात होतोय, आता जागे व्हा - माजी लष्करप्रमुख
भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे. मागील चोवीस तासात 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चीनच्या कुरापती सुरूच | सीमेवर भारत आणि चिनी सैनिकांच्या धुमश्चक्रीत 20 चिनी सैनिक जखमी
भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती अजूनही सुरूच आहे. नियंत्रण रेषेवर चीनने सैनिकांचा फौजफाटा जमवलेला असतानाच तीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवांनानी चिनी सैनिकांचा हा प्रयत्न हाणून पडला. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत 20 चिनी सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
चीनी सैनिकाला घेतले ताब्यात | प्रोटोकॉलनुसार चौकशी झाली सुरू
भारत आणि चीन दरम्यान पुन्हा लडाख सीमेवर चिनी सैन्याने एलएसीमध्ये प्रवेश केल्याची बातमी आहे. सध्या भारतीय सैन्याने प्रोटोकॉलअंतर्गत एका चीनी शिपायाला ताब्यात घेतले आहे. अधिकृत वृत्तानुसार, एका चिनी सैनिकाला आदल्या दिवशी लडाखमध्ये भारतीय सैन्याने ताब्यात घेतले होते. चिनी सैन्याने एलएसी ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार विहित प्रक्रियेनुसार त्यांची चौकशी केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
लष्कराने सीमा रेषा ओलांडून अनेकदा कारवाया केल्या | पण सर्जिकल स्ट्राईकचा मोदींकडून अतिप्रचार
इंदिरा गांधी या पंतप्रधान असत्या तर ज्या प्रकारे त्यांनी सिक्कीम सोबत केलं त्याचप्रमाणे याला त्यांनी नकार दिला नसता,’ असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. ‘नेपाळमध्ये राजेशाही सुरू झाल्यानंतर नेहरूंनी त्या ठिकाणी लोकशाही स्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली. नेपाळचे राजा त्रिभूवन बीर ब्रिकम शाह यांनी नेपाळला भारताचा भाग बनवण्याचा प्रस्ताव सूचवला होता. परंतु नेहरूंनी त्या प्रस्तावाला नकार दिला. नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यांनं तसंच राहावं असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्यांच्याजागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी या संधी स्वीकारली असती. जसं त्यांनी सिक्कीमसोबत केलं होतं,’ असंही यात प्रणव मुखर्जी यांनी नमूद केलं.
4 वर्षांपूर्वी -
संरक्षण समिती बैठक | सैन्य सुसज्जता सोडून लष्कराच्या गणवेशावर चर्चा | काँग्रेसचा वॉकआऊट
संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीत सैन्य दलातील जवानांचे ड्रेस बदलण्याच्या चर्चेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच भडकले. जवानांना कशा पद्धतीचा गणवेश असावा हे समितीतील खासदार ठरवू शकत नाहीत. तो आपला अधिकार नाही, सैन्य दलांच्या प्रमुखांनाच गणवेशाबाबतचा निर्णय घेऊ द्यावा, असं सांगत राहुल गांधी यांनी या चर्चेला विरोध केला. त्यामुळे या समितीचे अध्यक्ष जुएल ओरम आणि राहुल गांधी यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे संतापलेल्या राहुल यांनी या समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
4 वर्षांपूर्वी -
Nagrota encounter | २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला
जम्मू काश्मीरमध्ये नगरोटा इथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या घटनेचं वृत्त सगळीकडे प्रसिद्ध झालं. पण नगरोटा इथे मारले गेलेले दहशतवादी काही ठराविक उद्देशाने सीमेपलीकडून भारतात घुसवण्यात आले होते, याबद्दलचा मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या एका बैठकीत करण्यात आला. नगरोटाची घटना बॉर्डर ग्रीड रणनीचं (Border Grid) यश मानलं जात आहे. हे अतिरेकी तिथे मारले गेले नसते तर देशात त्यांनी हाहाकार उडवला असता.
4 वर्षांपूर्वी -
Fake News | पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइकचं वृत्त खोटं | लष्कराची माहिती
भारतीय लष्कराने सीमेपलीकडे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे तळ आज उद्ध्वस्त केले या बातमीत तथ्य नसल्याचं भारतीय लष्कराचे सरव्यवस्थापक लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह Director General Military Operations (DGMO) यांनी म्हटलं आहे. ‘भारतीय लष्कराने आज कुठलीही कारवाई केली नाही’, असं लष्करानेही स्पष्ट केलं आहे. पण त्याचबरोबर गेल्या आठवड्यातल्या कारवाईच्या बातमीबद्दल मात्र कुठलीही माहिती दिलेली नाही आणि ती कारवाई नाकारलेलीसुद्धा नाही.
4 वर्षांपूर्वी -
विस्तारवाद ही मानसिक विकृती | मोदींचा चीनवर निशाणा
भारताच्या जवानांनी १०७१ च्या युद्धा पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या जैसलमेरमधील लोंगेवालाच्या पोस्ट पंतप्रधान मोदींनी ( Prime Minister Narendra Modi) चीन, पाकिस्तानला ठणकावलं आहे. भारत आज समजण्यात आणि समजावण्याच्या नितीवर विश्वास ठेवतो. आणि कुणी जर आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तरही प्रचंडच मिळेल, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.
4 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर | पाकिस्तानचे ११ सैनिक ठार
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या गुरेझ ते उरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचा शुक्रवारी पुन्हा भंग केला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून (Indian Army) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. केरन, पुंछ आणि उरीमध्ये गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅड भारतानं उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईनं पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या राजदूतांना पाकिस्तान सरकारनं समन्स बजावलं आहे. याशिवाय काल रात्रभर सीमावर्ती भागात बेछूट गोळीबार सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन | २ जवान शहीद | ४ नागरिकांचाही मृत्यू
सणाच्या तोंडावरच पाकस्तानने (Pakistan) आपल्या भ्याडपणा दाखवत शुक्रवारी नियंत्रण रेषेवर (LOC) विविध भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन (ceasefire violation) केले. या दरम्यान भारताचा एक जवान शहीद झाला असून एका भारतीय नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. तर आणखी एक नागरिक जखमी झाला आहे. जखमी नागरिकास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहिती नुसार, नियंत्रण रेषेजवळ करेनपासून ते उरी सेक्टरपर्यंत अनेक ठिकाणी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर देत आहे.
4 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीर | कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये तीन जवान शहीद | दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह ३ जवान शहीद झाले आहेत. तर २ दहशतवादी मारले गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
काश्मिरात सुरक्षा दलांची मोठी कारवाई | हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडरचा खात्मा
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरचा (Hizbul Mujahideen Chief Commander) खात्मा करण्यात आला आहे. सैफुल्लाह असं दहशतवाद्याचं नाव आहे. श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. तर एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लष्कराच्या जवानांना नॉन-बुलेट प्रूफ़ ट्रक | पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचं विमान
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष केलं आहे. भारतीय जवानांचा ट्रकमधून जातानाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे. त्यामध्ये त्यांनी लष्कराच्या जवानासोबत केला जाणारा दुजाभाव समोर आणला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पँगाँग फिंगर ८ पर्यंत भारताची हद्द | मात्र चिनी सैन्य फिंगर ८ पासून फिंगर ४ पर्यंत घुसल्याच वृत्त
मॉस्कोमध्ये भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये जवळपास अडीच तासाची चर्चा झाल्यानंतरही दोन्ही देशात तणावाच वातावरण आहे. दोन्ही देशातील सैनिक लडाखमध्ये शस्त्र आणि दारूगोळा घेऊन ३०० मीटर दूर आमने-सामने उभे आहे. याच दरम्यान जपान आणि ताइवान या दोन देशांनी चीनला आपल्या देशातील सीमेचं उल्लंघन केल्याप्रकरणी चेतावणी जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिनी सैनिकांच्या हातात तलवारी-भाल्यासारखी हत्यारे | चिनी युद्ध सदृश्य वातावरण करतोय
सोमवारी सायंकाळी भारतीय जवानांनी अडविल्यावर चिनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला होता. यानंतर आज पुन्हा त्यांनी घुसखोरीचा प्रयत्ने केला असून गलवानसारखा धोका देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय चौकीला धारधार हत्यारे हातात घेऊन 50 चिनी सैनिकांनी घेरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, धाडसी जवानांनी चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये पुन्हा तणाव वाढला | भारतानं वॉर्निंग शॉट्स फायर केल्याचा चीनचा आरोप
मागच्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाग्रस्त स्थिती आहे. 29 आणि 30 ऑगस्टला रात्री चीननं पँगोग त्सो इथे घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय जवानांनी तो हाणून पाडल्यानंतर पुन्हा एकदा 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर गोळीबार झाला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS