पँगाँग टीएसओमध्ये भारताने चीनचा डाव उधळला | वातावरण पुन्हा तापलं
लडाख, ३१ ऑगस्ट : भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचं नाव घेत नाही. मुजोर चीनची दादागिरी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून उल्लंघन होत असल्याचं पाहायला पुन्हा एकदा मिळालं. गॅलव्हान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली.
चीननं भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून भारतीय सैन्यातील जवानांनी ड्रॅगनचा हा डाव उधळून लावल्याची माहिती मिळाली आहे. गलवान खोऱ्यानंतर चीननं आपलं सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केलं होतं. चीनच्या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याची चाहूल लागल्यानं ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.
लडाखमधील पँगाँग टीएसओ परिसराचा भूगोल काय सांगतो;
पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्र एक निसर्गरम्य परिसर आहे. याच ठिकाणी प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘३ इडियटस’चा महत्वाचा सीन चित्रीत झाला होता. लडाखला येणारे पर्यटक या तलाव क्षेत्राच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतात. पण याच तलावावरुन भारत आणि चीनमध्ये वाद आहे. या तलावामधून दोन्ही देशांची सीमारेषा जाते.
पँगाँग टीएसओ तलावाचा ४५ किलोमीटरचा भाग भारताच्या नियंत्रणाखाली आहे तर उर्वरित भाग चीनच्या नियंत्रणाखाली येतो. सध्या पँगाँग तलावाच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर क्षेत्र मुख्य कळीचा मुद्दा बनला आहे. कारण चीनने इथे फिंगर फोरपर्यंत घुसखोरी केली आहे.
या परिसरात नेमक्या काय हालचाली होत असतात;
पँगाँग तलाव समुद्रसपाटीपासून १४,५०० फूट उंचीवर आहे. या तलावाजवळ हाताच्या बोटांचा आकार जसा असतो, तसे आठ डोंगर आहेत. भारत-चीनमधला सीमावाद हा फिंगर चार ते फिंगर आठ दरम्यान आहे. फिंगर फोर पर्यंतचा भाग भारताच्या ताब्यात आहे. फिंगर चार ते फिंगर आठ दरम्यान दोन्ही देशांचे सैन्य पेट्रोलिंग करते.
चीनने फिंगर चार पर्यंत रस्ता बनवला आहे. या तलावाच्या किनाऱ्याजवळ भारतीय सैन्याचा बेस कॅम्प आहे. फिंगर चार ते आठ दरम्यान भारतीय सैनिक गस्त घालण्यासाठी पायीच चालत जातात. पाच मे नंतर चिनी सैन्य फिंगर चार पर्यंत आले आहे. चिनी सैन्याच्या या घुसखोरीमुळे भारताला आता फिंगर आठपर्यंत गस्त घालण्यावर मर्यादा आल्या आहेत. फिंगर चार ते आठमध्ये एकूण आठ किलोमीटरचे अंतर आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने फिंगर फोर ते फिंगर आठ दरम्यान कायमस्वरुपी बंकर, पीलबॉक्सेस आणि टेहळणी चौक्या उभ्या केल्या आहेत. हे सर्व बांधकाम पाडून चिनी सैन्य त्यांच्या मूळच्या फिंगर आठच्या जागी माघारी परतणे हा तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा भाग आहे. पण हे इतके सोपे सुद्धा नाही असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
News English Summary: Chinese troops “carried out provocative military movements to change the status quo” near Pangong Tso lake on Saturday night but they were blocked by Indian soldiers, the government said today. This took place on the south bank of the Pangong Tso, which is of huge significance as it is a new area, according to sources. A Brigade Commander-level meeting is on at Chushul to defuse tension, the government said.
News English Title: Chinese Aggression To Change Status Quo In Pangong Tso Lake Know About Eight Fingures In Ladakh News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय