चिनी सैनिकांच्या हातात तलवारी-भाल्यासारखी हत्यारे | चिनी युद्ध सदृश्य वातावरण करतोय
मुंबई, ८ सप्टेंबर : सोमवारी सायंकाळी भारतीय जवानांनी अडविल्यावर चिनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला होता. यानंतर आज पुन्हा त्यांनी घुसखोरीचा प्रयत्ने केला असून गलवानसारखा धोका देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय चौकीला धारधार हत्यारे हातात घेऊन 50 चिनी सैनिकांनी घेरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, धाडसी जवानांनी चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
लडाखमध्ये आज पुन्हा गलवानसारखा खूनी हल्ला करण्याचा मनसुबा चिनी सैन्याचा होता. रेजांग लाच्या उत्तरेकडील मुखपुरीमध्ये 40 ते 50 चिनी सैनिकांनी भारताच्या चौकीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या हातामध्ये धारधार सुरे, चॉपर आदी लावलेले भाले होते. यानंतर भारतीय जवानांनी हवेत गोळ्या झाडत त्यांना तेथून हुसकाऊन लावले.
चीनचे फोटोंमध्ये हा प्रकार दिसत आहे. सैनिक घातक शस्त्रे घेऊन रेजांग लाच्या उंचीवरील चौकीवर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार गलवान घाटीमध्ये घडला होता. भारतीय जवानांना घेरून चीनच्या सैनिकांनी खिळे लावलेल्या काटेरी रॉडने हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर भारतीय जवानांच्या प्रत्यूत्तरात चीनचे सैनिक मोठ्या संख्येने मारले गेले होते.
Chinese soldiers armed with stick machetes during their deployment along the Line of Actual Control (LAC) in Eastern Ladakh sector. pic.twitter.com/QmSGkJLoYw
— ANI (@ANI) September 8, 2020
सोमवारी काय घडलं होतं?
पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा चिनी लष्कराचा आरोप भारतीय लष्कराने फेटाळला. चिनी सैन्यांनी हवेत गोळीबार केला, तसंच भारतीय चौक्यांच्या जवळ आले होते अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. भारतीय लष्कराकडून सोमवारी संध्याकाळी लडाखमध्ये झालेल्या संपूर्ण घटनाक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. पिपल्स लिबरेशन आर्मी सतत कराराचं उल्लंघन करत असून आक्रमकता दाखवत असल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं होतं.
News English Summary: The Chinese army was planning to carry out another murderous attack in Ladakh today. At Mukhpuri, north of Rejang Lake, 40 to 50 Chinese troops attempted to capture an Indian outpost. At this time they had spears in their hands with sharp knives, choppers etc. After this, the Indian soldiers fired bullets in the air and drove them away.
News English Title: Chinese soldiers came with swords and spears in ladakh indian soldiers fired in air Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो