17 April 2025 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

लष्कराच्या जवानांना नॉन-बुलेट प्रूफ़ ट्रक | पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचं विमान

Rahul Gandhi, PM Narendra Modi, Indian Army

नवी दिल्ली, १० ऑक्टोबर : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष केलं आहे. भारतीय जवानांचा ट्रकमधून जातानाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे. त्यामध्ये त्यांनी लष्कराच्या जवानासोबत केला जाणारा दुजाभाव समोर आणला आहे.

एक व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “आपल्या जवानांना नॉन-बुलेट प्रूफ़ ट्रकमधून शहीद होण्यासाठी पाठवलं जातंय आणि पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचं विमान”, असं म्हणत मोदींना लक्ष केलं आहे.

तत्पूर्वी, राहुल गांधी सध्या कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी, ट्रॅक्टरवर एका कुशन लावलेल्या खुर्चीवर ते बसलेले काही फोटो समोर आले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावर बोट ठेवत राहुल गांधी यांना ‘व्हीआयपी शेतकरी’ म्हणत टीकाही केली होती. त्यावर पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलं होतं. ‘गाद्यांची गोष्ट करणारे ८००० कोटी रुपयांच्या विमानात गप्प का आहेत? त्या विमानात गाद्याच नाहीत तर ५० पलंग आहेत’ असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता.

 

News English Summary: Congress MP Rahul Gandhi has turned his attention to Prime Minister Narendra Modi again. He tweeted a video of Indian soldiers passing by in a non-bullet proof truck and slammed Modi. In it, he has brought to the fore the damage done to the army personnel.

News English Title: Congress leader Rahul Gandhi criticized PM Narendra Modi over facilities provided to Army Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या