संरक्षण समिती बैठक | सैन्य सुसज्जता सोडून लष्कराच्या गणवेशावर चर्चा | काँग्रेसचा वॉकआऊट
नवी दिल्ली, १६ डिसेंबर: संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीत सैन्य दलातील जवानांचे ड्रेस बदलण्याच्या चर्चेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच भडकले. जवानांना कशा पद्धतीचा गणवेश असावा हे समितीतील खासदार ठरवू शकत नाहीत. तो आपला अधिकार नाही, सैन्य दलांच्या प्रमुखांनाच गणवेशाबाबतचा निर्णय घेऊ द्यावा, असं सांगत राहुल गांधी यांनी या चर्चेला विरोध केला. त्यामुळे या समितीचे अध्यक्ष जुएल ओरम आणि राहुल गांधी यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे संतापलेल्या राहुल यांनी या समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. Congress leader walks out from parliamentary committee of defense.
संरक्षण विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जुएल ओरम यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीला लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी उपस्थित होते. लष्कर, हवाई दल आणि नौदलातील जवानांसाठी नव्या स्टाईलचा ड्रेस देण्याबाबतची चर्चा यावेळी करण्यात आली. त्यावेळी भाजपच्या एका खासदाराने अमेरिकन स्टाईलचे ड्रेस जवानांना देण्याची सूचना केली.
या बैठकीतून बाहेर पडताना राहुल गांधींनी आरोप केला की, संसदीय समितीने सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन वेळ खराब केला. त्याऐवजी सैन्याला चांगल्या प्रकारे सुसज्ज कसं केलं जावं यावर चर्चा होणं अपेक्षित होतं, अस ते म्हणाले. सीडीएस बिपिन रावत हे समितीपुढे जवानांच्या गणवेशाबाबत माहिती देत होते. यावेळी राहुल गांधी यांनी या चर्चेत हस्तक्षेप केला आणि लडाखमध्ये देशातील सैन्याची काय तयारी आहे? तसेच चीनविरोधात आपली रणनीती काय? यावर चर्चेची मागणी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष जुअल ओराम यांनी राहुल गांधी यांना मध्येच बोलण्यापासून रोखले. त्यानंतर राहुल गांधी यांनी या बैठकीतून वॉक आऊट केला. त्याचबरोबर त्यांच्यासोबत राजीव सांचा आणि रेवंथ रेड्डी हे देखील बैठकीतून बाहेर पडले.
News English Summary: Congress leader Rahul Gandhi and other party members walked out of the meeting of the Parliamentary Committee on Defense. Leaving the meeting, Rahul Gandhi alleged that the parliamentary committee wasted no time in discussing army uniforms. Instead, there was a discussion on how to better equip the army, he said.
News English Title: Congress leader walks out from parliamentary committee of defense news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News