ड्रॅगनचा हेतू शंका घेण्यासारखा | लडाखजवळ आधीच तैनात केली J-20 फायटर विमाने
लडाख, ३१ ऑगस्ट : भारत चीन यांच्यात गेल्या मे महिन्यापासून सुरू असलेला तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील पेंगाँग भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मिळालेल्या माहितीनुसार, 500 चिनी सैनिकांनी खुसखोरी करण्याचा प्रयत्न करत, आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्टच्या रात्री 500 चिनी सैनिकांनी, सीमेवरील आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक येथे तळ ठोकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच कारवाई करत त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मात्र, यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांत कुठल्याही प्रकारची झटापट झाली नसल्याचेही समोर आले आहे.
पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ क्षेत्रातील दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. चीनने ही लष्करी चाल करण्याआधी ‘होतान’ एअरबेसवर J-20 ही पाचव्या पिढीची अत्याधुनिक फायटर विमाने पुन्हा तैनात केली. ‘होतान’ हा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा लडाख सीमेपासून जवळ असलेला हवाई तळ आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.
चीनने ‘होतान’ एअर बेसवर J-20 फायटर विमानांची तैनाती केल्यापासून लडाख आणि आसपासच्या प्रदेशातील भारतीय सीमांजवळ या विमानांची उड्डाणे सुरु आहेत. मागच्या महिन्यात काशगर एअर बेसवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने H-6 बॉम्बर विमाने तैनात केल्याचे उपग्रह फोटोंवरुन समोर आले होते.
News English Summary: The Chinese Air Force redeployed its J-20 fifth generation fighters close to the Indian territory, days before the Chinese troops tried to carry out fresh transgressions near the southern bank of Pangong Tso lake in Ladakh.
News English Title: Days Before Fresh Clashes China Redeployed J 20 Jets Near Ladakh News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS