16 April 2025 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

विस्तारवाद ही मानसिक विकृती | मोदींचा चीनवर निशाणा

Expansionism, Mental Disorder, PM Narendra Modi, Criticizes Chinas

मुंबई, १४ नोव्हेंबर: भारताच्या जवानांनी १०७१ च्या युद्धा पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या जैसलमेरमधील लोंगेवालाच्या पोस्ट पंतप्रधान मोदींनी ( Prime Minister Narendra Modi) चीन, पाकिस्तानला ठणकावलं आहे. भारत आज समजण्यात आणि समजावण्याच्या नितीवर विश्वास ठेवतो. आणि कुणी जर आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तरही प्रचंडच मिळेल, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.

मोदी म्हणाले, “आज जगाला हे कळतंय की भारत आपल्या हितांविरोधात कोणत्याही किंमतीत थोडीही तडजोड करणार नाही. भारताची शान आणि उंची आपल्या शक्ती आणि पराक्रमामुळं टिकून आहे. आपण देशाला सुरक्षित ठेवलं आहे त्यामुळे आज भारत जागतीक व्यासपीठांवर प्रखरतेने आपली बाजू मांडत आहे.”

“आंतरराष्ट्रीय सहकार्य कितीही पुढे आलेलं असलं आणि समीकरणं कितीही बदलली असली तरी आपल्याला हे विसरता येणार नाही की, सतर्कता हाच आपली सुरक्षेचा मार्ग आहे. सजगता हीच सुख-चैनीचा पाठिंबा आहे. सामर्थ्यचं विजयाचा विश्वास आहे. सक्षमताच शांतीचा पुरस्कार आहे,” अशा शब्दांत मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं.

यावेळी पंतप्रधानांनी लोंगेवाला पोस्टवर भारतीय जवानांनी १९७१ मध्ये दाखवलेल्या अतुनलीय शौर्याच्या आठवणींना उजाळा दिला. ‘त्यावेळी पश्चिम पाकिस्तान (आताचा पाकिस्तान) ) पूर्व पाकिस्तानवर (आताच बांगलादेश) अत्याचार करत होता. आपली कृष्णकृत्यं लपवण्यासाठी, जगाचं लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्ताननं भारताच्या सीमेवर आक्रमण केलं. पण त्यांना ते महागात पडलं. लोंगेवालावर भारतीय जवानांनी पराक्रम गाजवला. तो इतिहास, तो पराक्रम, ते शौर्य आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजा आहे,’ अशा शब्दांत मोदींनी जवानांच्या साहसाच्या आठवणी जागवल्या.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi has lashed out at China and Pakistan over Longewala’s post in Jaisalmer. India today believes in a policy of understanding and persuasion. And if anyone tries to challenge, he will get a huge answer, Prime Minister Modi warned.

News English Title: Expansionism is a mental Disorder PM Narendra Modi criticizes Chinas role News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या