23 February 2025 1:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Breaking | लडाखमधील जवळपास १००० चौरस किमीचा भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली

India China, Ladakh

नवी दिल्ली, १ सप्टेंबर : लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य गेल्या ४ महिन्यांपासून आमनेसामने उभं ठाकलं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असताना चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारतीय जवानांनी चिनी सैन्याचे मनसुबे उधळले आहेत. मात्र सीमेवरील तणाव वाढला असताना लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटरचा भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली गेल्याचं वृत्त ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.

दरम्यान, चुशूल येथे सकाळी १० वाजेपासून कमांडर स्तरीय बैठक सुरू आहे. पँगोंगमध्ये चीनपेक्षा भारतीय सेना चांगल्या स्थितीत आहे. चीनने भारतावर एलएसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. २८-२९ ऑगस्टच्या रात्री पँगोंग भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये पुन्हा झटापट झाली होती.

चिनी सैन्याने लडाखमधील पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील काही भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या अवैध कामासाठी सुमारे ५०० चिनी सैनिक आले होते. चिनी सैनिकांकडे दोरी आणि इतर चढण्याची साधने होती. रात्रीच्या अंधारात चिनी सैनिकांनी ब्लॅक टॉप ते थाकुंग हाइट्स दरम्यान टेबल टॉप क्षेत्रात चढायला सुरवात केली पण भारतीय सेना आधीच सज्ज झाली होती. भारतीय सैनिकांनी प्रथम चिनी सैन्याला रोखले आणि त्यानंतर चीनला माघार घ्यायला भाग पाडले.

दरम्यान, इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये (शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर) आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनं कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत.

 

News English Summary: Chinese troops control around 1,000 square kilometres of the area along the Line of Actual Control (LAC) in Ladakh, as per the intelligence inputs provided to the government. China has been increasing the presence of its troops along the LAC since April.

News English Title: India China FaceOff China controls 1000 square Kilometre of area in Ladakh News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x