22 January 2025 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

लडाखमध्ये पुन्हा तणाव वाढला | भारतानं वॉर्निंग शॉट्स फायर केल्याचा चीनचा आरोप

Indian Army Fired, Warning Shots Along Lac, PLA Forced, China Global Times, Marathi News ABP Maza

लडाख, 08 सप्टेंबर : मागच्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाग्रस्त स्थिती आहे. 29 आणि 30 ऑगस्टला रात्री चीननं पँगोग त्सो इथे घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय जवानांनी तो हाणून पाडल्यानंतर पुन्हा एकदा 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर गोळीबार झाला आहे.

सोमवारी रात्री उशिरा पँगोंग त्सोवर रेषेजवळ (LAC) भारती-चिनी सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनच्या सरकारी मीडिया ‘ग्लोबल टाइम्स’ ने भारतीय सैनिकांवर पँगोंग त्सोच्या दक्षिणेकडील गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. सैनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुजोर चीनच्या बाजूने सुरुवातीला भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला, त्यानंतर जवानांनी चोख प्रत्युत्तर देत कारवाई केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे.

चिनी संरक्षण मंत्रालय, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते कर्नल झांग शुइली यांनी रात्री उशिरा सांगितले की, भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुरापतखोरी करणारी कारवाई केली. त्यामुळे चिनी सैन्याला प्रत्युत्तरदाखल कारवाई करावी लागली, मात्र प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील या गोळीबाराबाबत भारताकडून कुठलेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

झांग शुईली यांनी भारतीय लष्कराच्या आक्रमक कारवायांबाबत अजून एक खुलासा केला आहे. भारतीय लष्कराने सोमवारी अवैधपणे पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ असलेल्या शेनपाओ पर्वताच्या परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार केली, असा दावा झांग शुईली यांनी केला आहे.

 

News English Summary: China has claimed that Indian soldiers fired warning shots after crossing the Line of Actual Control in the south bank of Pangong Lake in Ladakh on Monday, days after a series of provocative actions at the LAC by the Chinese army. “The Chinese border guards were forced to take countermeasures to stabilize the situation,” a spokesperson of the People’s Liberation Army has said.

News English Title:  Indian Army Fired Warning Shots Along Lac PLA Forced To Take Countermeasures China Global Times Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x