5 November 2024 12:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

भारत-चीनचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये | तणाव वाढला

Indian Chinese Tanks, Within Firing Distance, Pangong Lake Eastern Ladakh

नवी दिल्ली, १ सप्टेंबर : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी LAC वरील स्थितीचा आढावा घेतला. डोवाल यांचं चीनशी कमांडर-स्तरावरील चर्चेकडेही लक्ष आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल अजित डोवल यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. गृहसचिव आणि गुप्तचर यंत्रणांचे प्रमुखही या बैठकीस उपस्थित होते. गुप्तचर यंत्रणांनी डोवल यांना चीनशी झालेल्या तणावाविषयी माहिती दिली.

चुशूल येथे सकाळी 10 वाजेपासून कमांडर स्तरीय बैठक सुरू आहे. पँगोंगमध्ये चीनपेक्षा भारतीय सेना चांगल्या स्थितीत आहे. चीनने भारतावर एलएसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. २८-२९ ऑगस्टच्या रात्री पँगोंग भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये पुन्हा झटापट झाली होती.

चिनी सैन्याने लडाखमधील पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील काही भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या अवैध कामासाठी सुमारे 500 चिनी सैनिक आले होते. चिनी सैनिकांकडे दोरी आणि इतर चढण्याची साधने होती. रात्रीच्या अंधारात चिनी सैनिकांनी ब्लॅक टॉप ते थाकुंग हाइट्स दरम्यान टेबल टॉप क्षेत्रात चढायला सुरवात केली पण भारतीय सेना आधीच सज्ज झाली होती. भारतीय सैनिकांनी प्रथम चिनी सैन्याला रोखले आणि त्यानंतर चीनला माघार घ्यायला भाग पाडले.

दरम्यान, इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये (शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर) आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनं कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.

चीनकडून जड आणि तसंच हलक्या वजनाचे रणगाडे तैनात करण्यात आले असून भारतापासून जवळच्या अंतरावर आहेत. दुसरीकडे कालाटोप येथे तैनात असणारे भारतीय जवानही रणगाडे आणि तोफांसोबत पूर्णपणे सुसज्ज आहेत. कालाटोप भारतीय स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या ताब्यात असून इतर ठिकाणीही लष्करी तुकड्या तैनात असल्याने चिनी रणगाडे आणि वाहनांची हालचाल सध्या थांबली आहे. यादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा सुरु आहे. सकाळी ९ वाजल्यापासून या चर्चेला सुरुवात झाली आहे.

 

News English Summary: The situation on the southern bank of the Pangong Lake area in eastern Ladakh remains tense following renewed tensions between India and China at the Line of Actual Control (LAC). According to sources, Indian and Chinese tanks have been stationed within firing distance of each other even as fresh military talks continue for the second day on Tuesday.

News English Title: Indian Chinese Tanks Within Firing Distance After Tension Over Line Of Actual Control In Pangong Lake Eastern Ladakh News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x