महत्वाच्या बातम्या
-
एकाबाजूने चीन तर दुसरीकडून पाकिस्तानही हल्ला करणार | बिपीन रावत यांचा गंभीर इशारा
लडाखमध्ये चीन युद्ध करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. यामुळे भारताने अरुणाचलप्रदेशसह एलएसीवरील भागात सैन्य कुमक वाढविण्यास सुरुवात केली असून सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी मोठा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारत-चीन तणाव | भारताचे लष्करप्रमुख लडाखमध्ये दाखल
भारत-चीन तणावाच्यावेळी भारतीय फौजांनी आक्रमक धोरण अवलंबले आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी व्युहरचना करण्यात येत आहे. पँगाँग त्सो तलाव भागाच्या दक्षिणेकडील अतीमहत्त्वाच्या पोस्टवर भारताने बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. पँगाँग त्सो तलाव परिसरातली जैसे थे स्थिती बदलण्याचा पीएलएचा डाव हाणून पाडल्यावर आता भारताने इथे तैनात वाढवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
माध्यमांकडून फेक न्यूज | चिनी सैनिकांच्या कबरी १९६२ मधील | जोडली गलवान खोऱ्याशी
गलवान खोऱ्यात १५ जूनला भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यात झालेल्या भीषण सामोरामुळे २० भारतीय सैन्य जवान ठार झाले. दुसरीकडे, चिनच्या बाजूने नेमकं काय नुकसान झालं याची कोणतीही अधिकृत माहिती चीन सरकारकडून देण्यात आली नव्हती. केवळ निरनिराळ्या बाजूनी अंदाज बांधण्यात आले होते, ज्याला कोणताही पुरावा नव्हता. भारतीय माध्यमांनी देखील केवळ अंदाजच मांडले होते. मात्र आता भारतीय माध्यमांना याच विषयाला अनुसरून चुकीचे फोटो प्रसिद्ध करून फेक न्युज पसरविण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | लडाखमधील जवळपास १००० चौरस किमीचा भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली
लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य गेल्या ४ महिन्यांपासून आमनेसामने उभं ठाकलं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असताना चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारतीय जवानांनी चिनी सैन्याचे मनसुबे उधळले आहेत. मात्र सीमेवरील तणाव वाढला असताना लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटरचा भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली गेल्याचं वृत्त ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारत-चीनचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये | तणाव वाढला
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी LAC वरील स्थितीचा आढावा घेतला. डोवाल यांचं चीनशी कमांडर-स्तरावरील चर्चेकडेही लक्ष आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल अजित डोवल यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. गृहसचिव आणि गुप्तचर यंत्रणांचे प्रमुखही या बैठकीस उपस्थित होते. गुप्तचर यंत्रणांनी डोवल यांना चीनशी झालेल्या तणावाविषयी माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
आमच्याशी स्पर्धा कराल तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल - चीनची धमकी
भारत आणि चीनमधील तणाव कायम आहे. २९ आणि ३० ऑगस्टला चिनी सैन्यानं पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यानंतर चिनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सनं दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ड्रॅगनचा हेतू शंका घेण्यासारखा | लडाखजवळ आधीच तैनात केली J-20 फायटर विमाने
भारत चीन यांच्यात गेल्या मे महिन्यापासून सुरू असलेला तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील पेंगाँग भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मिळालेल्या माहितीनुसार, 500 चिनी सैनिकांनी खुसखोरी करण्याचा प्रयत्न करत, आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.
4 वर्षांपूर्वी -
पँगाँग टीएसओमध्ये भारताने चीनचा डाव उधळला | वातावरण पुन्हा तापलं
भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचं नाव घेत नाही. मुजोर चीनची दादागिरी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून उल्लंघन होत असल्याचं पाहायला पुन्हा एकदा मिळालं. गॅलव्हान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली.
4 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैनिक पुन्हा आमने-सामने | दोन्ही सैन्यात झटापट झाल्याचं वृत्त
भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचं नाव घेत नाही. मुजोर चीनची दादागिरी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून उल्लंघन होत असल्याचं पाहायला पुन्हा एकदा मिळालं. गॅलव्हान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती मिळाली.
4 वर्षांपूर्वी -
सीमेवर घुसखोरीसाठी जमिनीखालून भूयारी मार्ग | सीमा सुरक्षा दलांनी डाव उधळला
मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराकडून कुरापती सुरू असून, सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. सीमेपलीकडून वारंवार होत असलेल्या गोळीबारामुळे सीमा सुरक्षा दलाकडून घुसखोरीसाठी वापर करण्यात येणाऱ्या जमिनीतील भूयारी मार्गांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. शोध घेत असताना जवानांना सीमेवर जमिनीत २५ फूट खोलीवर १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला आहे. त्यामुळे घुसखोरीचा मोठा कट लष्करानं उधळून लावला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO