13 January 2025 7:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल

Health Insurance Premium

Health Insurance Premium | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ इंश्योरेंस प्रीमियम घेत असतो. आपल्यानंतर आपलं कुटुंब वाऱ्यावर पडू नये किंवा कुटुंबाला कोणताही प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी हेल्थ इंश्योरेंस प्रीमियम अत्यंत महत्त्वाचा असतो.

परंतु सध्याच्या घडीला बरेच इंश्योरेंस प्रीमियमच्या किंमती जास्त प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. आज आम्ही तुम्हाला तुमचा इंश्योरेंस प्रीमियम कशा पद्धतीने कमी होऊ शकतो याबद्दल काही टिप्स सांगणार आहोत. इंश्योरेंस कमी होण्यासाठी तुम्ही को – पे आणि डिडक्टेबलचा पर्याय निवडू शकता.

ज्येष्ठांना मिळणारं सर्वाधिक फायदा :

को-पे आणि डिडक्टबल या दोन्ही पर्यायांचा फायदा सर्व प्रकारच्या इंश्योरेंस प्रीमियममध्ये होताना पाहायला मिळतो. परंतु याचा सर्वात जास्त फायदा सर्वसामान्यांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना होतो. कारण की, वृद्ध व्यक्तींना त्यांच्या आजारपणासाठी, औषध पाण्यासाठी जास्त पैशांचे पेमेंट करावे लागते. असा परिस्थितीत डिडक्टेबल म्हणजे क्लेम करण्याआधी म्हणजेच पैसे काढण्याआधी इंश्योरेंसचे पैसे कंपनीकडून चुकते केले जातात. एवढेच नाही तर को – पे अंतर्गत देखील क्लेमचा काही भाग फेडला जातो.

दोन्ही पर्यायांचे काम काय :

1. सर्वप्रथम हे समजून घ्या की, विमा कंपनी आणि विमाधारक या दोघांमध्ये समान खर्च केला जातो.

2. त्यामुळे को-पेचे पैसे जेवढे वाढतील तेवढाच तुमचा प्रीमियम कमी होत जाईल.

3. तुम्हाला पर्याय समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही हेल्थ प्लॅन इंश्योरेंस 20,000 रुपयांचा वार्षिक प्रीमियम घेतला आहे आणि तुम्ही को – पे साठी 20% टक्क्यांपर्यंत पर्याय निवडला आहे तर तुमचे जास्तीत जास्त 5000 रुपये वाचतात. या दोन्ही पर्यायांचा तुम्हाला हजारोच्या संख्येत फायदा होतो.

4. डिडक्टेबलबद्दल सांगायचे झाले तर, हेल्थ इंश्योरेंस कंपनीकडून तुम्हाला पर्याय दिले जातात. यामध्ये ठरवलेल्या रक्कमेचं पेमेंट तुम्हाला आधीच करायचे असते आणि त्यानंतरच तुम्ही जी रक्कम क्लेम करणार असाल ती इंश्योरेंस कंपनीकडून पेमेंट केली जाते. म्हणजेच काय तर या पर्यायामुळे तुम्हाला करावयाचे पेमेंट कमीत कमी होऊन जाते. अशा परिस्थितीत तुमचा जास्तीत जास्त पैसा वाचतो.

5. डिडक्टबल पर्यायामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सूट मिळण्याची शाश्वती असते. तुम्ही यामध्ये नो क्लेम बोनस सुरक्षा देखील प्राप्त करू शकता.

6. समजा तुम्ही खरेदी केलेल्या पॉलिसीची रक्कम 10 लाख रुपये आहे आणि या पैशांमधील 50,000 ची रक्कम डिडक्टबल अमाऊंट आहे. तर, अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा क्लेम कराल म्हणजेच पैसे काढाल तेव्हा तुमची 50,000 रक्कम बाजूला काढून घेतली जाईल. याचाच अर्थ असा की, तुम्ही 4 लाखांची रक्कम क्लेम करत असाल तर, तुम्हाला विमा कंपनीकडून 3.5 लाख रुपयांची रक्कम हेल्थकेअर विमाकंपनी देणार.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Health Insurance Premium Wednesday 11 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Health Insurance Premium(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x