4 October 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | शनिवार 05 ऑक्टोबर, 'या' 6 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 05 ऑक्टोबरचं राशीभविष्य - Marathi News Yes Bank Share Price | येस बँकेबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार प्राईस, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, मोठ्या कमाईची संधी - Marathi News Monthly Pension Scheme | महिना खर्चाचं टेन्शन मिटेल, दरमहा मिळेल रु.5000 पेन्शन, गुंतवणूक फक्त 210 रुपये - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Post Office Scheme | सलग 5 वर्षांपर्यंत मिळवा महिना 9,250 रुपये पेन्शन, अधिक लाभ घेण्यासाठी काय करावे पहा - Marathi News Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल
x

Insurance Policy Alert | इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर करा आणि मिळवा अधिक लाभ, फायद्याचा नियम जाणून घ्या - Marathi News

Highlights:

  • Insurance Policy Alert
  • या प्रकारच्या पॉलिसींसाठी बदलले नियम :
  • 1 वर्षात मिळणारा परतावा :
  • आर्थिक नुकसान नियंत्रित केले जाऊ शकते :
  • पॉलिसी सरेंडर करा आणि मिळवा जास्तीचा परतावा :
Insurance Policy Alert

Insurance Policy Alert | बऱ्याच सर्व सामान्य कुटुंबांमध्ये कुटुंबप्रमुख त्याचबरोबर नोकरी पेशामध्ये असणारा कोणताही व्यक्ती आयुर्विमा काढतो. आयुर्विमामुळे अचानक अपघात, किंवा काही कारणांमुळे मृत्यू झाला तर, आयुर्विमा खातेधारकाच्या कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी विमा कंपनी फायद्याची ठरते. तुमच्यापैकी अनेकांनी आयुर्विमा पॉलिसीचा लाभ घेतला असेल. आज आम्ही तुम्हाला या पॉलिसी बद्दलच्या नवीन नियमानविषयी माहिती सांगणार आहोत.

वीमा नियामक क्षेत्र IRDAI ने 2024 च्या 1 ऑक्टोबरपासून नवीन नियमावली लागू केली आहे. या नवीन नियमामध्ये पॉलिसीधारकाने त्याची पॉलिसी सरेंडर केली तर, त्याला अधिक परतावा मिळणार आहे. नवीन नियमानुसार विमा कंपन्यांना पॉलिसीवर एक सरेंडर व्हॅल्यू द्यावी लागेल. या कारणामुळे तुम्हाला तुमची पॉलिसी सरेंडर करणे सोपे होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला जास्त परतावा देखील मिळेल.

या प्रकारच्या पॉलिसींसाठी बदलले नियम :
विमा पॉलिसीच्या नव्या नियमानुसार गॅरंटी सरेंडर मूल्य नियमांच्या येण्याचे तीन मुख्य फायदे अनुभवता येतील. पॉलिसीधारकाने पॉलिसी सरेंडर केल्याबरोबर त्याला आधीपेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये पारंपारिक जीवन विमा त्याचबरोबर गैरसहभागी, आणि बोनस आधारित पॉलिसी शामिल आहेत.

1 वर्षात मिळणारा परतावा :
समजा एखाद्या व्यक्तीने पॉलिसीकरिता 5 लाखांची पॉलिसी 10 वर्षांसाठी खरेदी केली आणि सर्वात पहिल्या वर्षाला 50 हजारांचा प्रीमियम भरून जुन्या नियमाप्रमाणे एका वर्षानंतर पॉलिसी सरेंडर केली तर, त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा परतावा मिळणार नाही. याचाच अर्थ पॉलिसीधारकाचे सर्व पैसे बुडून जातील. परंतु नवीन नियम असं सांगतात की एका वर्षानंतर पॉलिसी सरेंडर केल्यावर शंभर टक्के परतावा मिळेल. विमा कंपनीने संपूर्ण वर्षांसाठी प्रीमियम मिळवला असेल तर, खातेधारकाला 31,295 रुपये परत द्यावे लागतील.

आर्थिक नुकसान नियंत्रित केले जाऊ शकते :
नवीन नियमांच्या घोषणेनंतर विमा कंपन्यांनी कमिशनची रचना बदलण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. कारण की नवीन नियमानुसार नफा वाचवला जाऊ शकतो. यांपैकी काही कंपन्या 50-25-25 या मॉडेलचा उपयोग करू शकतात. याचाच अर्थ असा की, एजंटचे 50% कमिशन त्याला पहिल्याच वर्षी दिले जाईल आणि बाकीचे उर्वरित कमिशन दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी विभागून दिले जाईल. त्याचबरोबर काही कंपन्या ट्रेल कमिशनचा विचार करू पाहत आहेत. यामध्ये पॉलिसीच्या वेळेतच पैसे दिले जाऊ शकतात. एवढंच नाही तर, लवकर सरेंडर केल्यानंतर होणार नुकसान देखील टाळले जाऊ शकते.

पॉलिसी सरेंडर करा आणि मिळवा जास्तीचा परतावा :
गुंतवणूक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जुन्या पॉलिसी नियमाप्रमाणे चौथ्या आणि सातव्या वर्ष दरम्यान पॉलिसी सरेंडर केली तर एकूण 50% प्रीमियम भरणे अनिवार्य होते. समजा तुम्ही 4 वर्षांसाठी पॉलिसी सरेंडर करत आहात तर, पूर्वीच्या सरेंडर नियमांप्रमाणे 1.2 लाख रुपये परत मिळाले असते. परंतु नवीन नियमांचा अहवाल लक्षात घेता पॉलिसी सरेंडर केल्यानंतर तुम्हाला 1.55 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

Latest Marathi News | Insurance Policy Alert 03 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Insurance Policy Alert(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x