1 February 2025 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Slab | पगारदारांनो, स्टँडर्ड डिडक्शनसह इन्कम टॅक्सशी संबंधित 'या' 3 मर्यादेत वाढ केली जाऊ शकते Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कोटक सिक्युरिटीज ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार हा रेल्वे शेअर, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा - NSE: IRFC SBI Saving Account | SBI बँक ग्राहकांसाठी खशखबर, मिनिमम बॅलेन्सच्या सुविधेसह 'या' गोष्टी मिळतील मोफत Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर खरेदीसाठी झुंबड, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN HUDCO Share Price | मालामाल करणार हा मल्टिबॅगर PSU शेअर, मिळेल मजबूत परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर मालामाल करणार, गुंतवणूकदार तुटून पडले, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

Investment Plan | जबरदस्त फायद्याची योजना, 10 लाखांच्या गुंतवणुकीवर 35 लाखांचा परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या

Investment plan

Investment plan| जर तुम्ही एलआयसी च्या एखाद्या चांगल्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एलआयसी रेग्युलर प्रीमियम युनिट लिंक्ड प्लॅन म्हणजेच SIIP मध्ये पैसे गुंतवून जबरदस्त परतावा कमवू शकता. जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा लोकांच्या मनात फक्त एकच विचार येतो तो म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ ज्याला आपण LIC म्हणूनही ओळखतो. अनेक वर्षांपासून लोक एलआयसीमध्ये गुंतवणूक करणे अतिशय सुरक्षित मानतात.

आजच्या काळात गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय अस्तित्वात असूनही, LIC ची विश्वासार्हता लोकांमध्ये कायम तर आहे , ती वाढत देखील आहे. LIC भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असून ती विविध गुंतवणूक योजना देखील चालवते. जर तुम्ही एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एलआयसी रेग्युलर प्रीमियम युनिट लिंक्ड प्लॅन म्हणजेच SIIP योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्हाला 21 वर्षांसाठी सुमारे 10 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यावर तुम्हाला सुमारे 35 लाखांचा नफा होईल. म्हणजेच या योजनेच्या मुदत पूर्तीनंतर तुम्हाला एकूण 45 लाख रुपये परतावा मिळू शकतो. या योजनेशी संबंधित महत्त्वाची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

जोरदार परतावा : पद्धतशीर गुंतवणूक विमा योजनेलाच SIIP असे म्हणतात. LIC च्या SIIP योजनेत, तुम्हाला दरमहा फक्त 4000 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला ही गुंतवणूक पुढील 21 वर्षांसाठी करावी लागेल. 4000 रुपये प्रति महिना दराने, तुम्ही एका वर्षात 48000 रुपये जमा कराल आणि पुढील 21 वर्षात तुमची 10,08,000 रुपये ची गुंतवणूक होईल. ही योजना पूर्ण झाल्यावर तुम्हाला एकूण 45 लाख रुपये परतावा मिळेल. म्हणजे, योजना पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला 34,92,000 रुपये (सुमारे 35 लाख रुपये) नफा होईल.

प्रीमियम जमा करण्याची पद्धत : SIIP योजनेअंतर्गत तुम्ही चार वेगवेगळ्या प्रकारे (मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक) पद्धतीने प्रीमियम जमा करू शकता. मासिक 4000 रुपये भरण्याऐवजी, जर तुम्ही संपूर्ण वर्षाचे प्रीमियम भरला तर तुम्हाला 48,000 रुपयांऐवजी फक्त 40,000 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय, सहामाही आधारावर 22,000 रुपये आणि तिमाही आधारावर 12,000 रुपये भरावे लागतील. त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला 30 दिवसांचा आणि मासिक प्रीमियमसाठी 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जाईल.

विमा प्रक्रिया : SIIP योजनेअंतर्गत, पॉलिसी मुदत पूर्ण होईपर्यंत तुम्हाला 4,80,000 रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल. तुम्ही ह्या योजनेत ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही डिमॅट खात्याची गरज लागणार नाही. SIIP योजनेचा लॉकिन कालावधी पाच वर्षांचा असतो. पाच वर्षानंतर गुंतवणूकदार ते कधीही सरेंडर करू शकतो. पाच वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर केल्यास कोणताही चार्ज लागणार नाही. लक्षात ठेवा की सरासरी परिपक्वता रक्कम वार्षिक 15 टक्के या निव्वळ मालमत्ता मूल्य वाढीच्या दरावर आधारित असेल. पण गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News title | Investment plan in LIC SIIP scheme for benifits on 24 August 2022

हॅशटॅग्स

#Investment Plan(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x