24 December 2024 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Investment Plan | वार्षिक 40 हजार रुपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीला तुम्हाला 35 लाख रुपये परतावा मिळेल

Investment Plan

Investment Plan | आजच्या काळात गुंतवणुकीपासून पॉलिसीपर्यंत बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र आजही अनेक पॉलिसीधारक आणि गुंतवणूकदारांचा एलआयसीवर विश्वास आहे. आजही लोक एलआयसीला गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानतात. याशिवाय एलआयसीच्या काही पॉलिसींमध्ये ही तुम्ही करसवलतीचा लाभ घेऊ शकता.

युनिट लिंक्ड प्लॅन आणि एसआयआयपीमध्ये गुंतवणूक
कोणताही ग्राहक एलआयसीमध्ये गुंतवणूक करू शकतो. जर तुम्हालाही एलआयसीचा उत्तम प्लॅन खरेदी करायचा असेल तर तुम्ही एलआयसी रेग्युलर प्रीमियम युनिट लिंक्ड प्लॅन आणि एसआयआयपीमध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूकदाराला २१ वर्षांसाठी वार्षिक ४० हजार रुपये जमा करावे लागतात. त्याच्या मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला जवळपास तिप्पट परतावा दिला जातो.

एसआयआयपी म्हणजे काय?
एसआयआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स प्लॅन ही एलआयसीची योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदाराला २१ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. या अंतर्गत तुम्ही मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता. गुंतवणूकदाराला वार्षिक ४० हजार रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो. याशिवाय सहामाहीमध्ये 22000 रुपये, तिमाहीमध्ये 12 हजार रुपये आणि मासिक 4000 हजार रुपये प्रीमियम भरावा लागेल. याशिवाय ग्रेस पीरियडचा ही पर्याय आहे.

एलआयसीच्या एसआयआयपीवर किती फायदा?
जर तुम्ही एलआयसीच्या एसआयआयपीमध्ये वार्षिक 40,000 रुपयांचा प्रीमियम भरला तर 21 वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर सुमारे 35 लाख रुपये मिळतील. तसेच गुंतवणूकदारांना 4,80,000 रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

एसआयआयपी ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी
आपण एसआयआयपी ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता. याचा ऑफलाइन लाभ घेण्यासाठी तुम्ही एलआयसीच्या कार्यालयात जाऊ शकता. याशिवाय एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Investment Plan LIC Monthly Investment Plan return check details on 09 February 2023.

हॅशटॅग्स

#Investment Plan(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x