17 April 2025 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
x

Investment Plan | फक्त 29 रुपये पासून गुंतवणूक सुरू करा, मॅच्युरिटीला मोठा परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या

Investment plan

Investment Plan | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC मध्ये विविध वयोगटातील आणि विविध उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी अनेक विमा योजना पर्याय आहेत. पोस्ट ऑफिस आणि बँक बचत योजनांनंतर, LIC योजनांना देशात पैसे बचत करण्यासाठी खूप लोकप्रिय आहेत. आणि गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय देखील मानला गेला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या योजनेत गुंतवणुकीवर तुम्हाला कोणताही धोका होत नाही. LIC ची आधार शिला योजना ही एक नॉन-लिंक वैयक्तिक जीवन विमा योजना असून जी फक्त खास बालिका आणि महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.

LIC च्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे आर्थिक सुरक्षा आणि बचत हे दोन्ही उद्दीष्टे पूर्ण होतात. या योजनेत सुरक्षितता आणि बचत हे दोन्ही सुविधा तुम्हाला मिळतील. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला 4 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी दररोज फक्त 29 रुपये जमा करावे लागतील. या विम्याअंतर्गत, पॉलिसीधारकाचे पॉलिसी मुदत पूर्तीपूर्वी निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबालाही आर्थिक सहाय्य दिले जातील. यासोबतच, मुदत पूर्तीवर तुम्हाला एकरकमी रकमेचा पूर्ण फायदा देखील मिळेल म्हणजेच LIC च्या या योजनेमध्ये जीवन सुरक्षा आणि बचत असे दोन्ही उद्दिष्टे पूर्ण होतात.

या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंत विमा प्रीमियम जमा करू शकता. या विम्याअंतर्गत किमान विमा रक्कम 75,000 रुपये प्रति व्यक्ती आहे. आणि कमाल विमा रक्कम 3 लाख रुपये प्रती व्यक्ती आहे. याचा अर्थ LIC ची आधारशिला विमा प्रती व्यक्ती जास्तीत जास्त 3 लाख रुपयांना खरेदी करता येईल. या विमा पॉलिसीचा परिपक्वता कालावधी 10 ते 20 वर्षे असेल. या पॉलिसीमधील प्रीमियम 1, 3, 6, 12 महिन्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

परतावा किती असेल :
आपण एका उदाहरणाने समजून घेऊ, जर कोणी व्यक्ती एका दिवसात फक्त 29 रुपये बचत करते, तर तुम्ही LIC च्या या योजनेत एका वर्षभरात किमान 10959 रुपये गुंतवू शकता. समजा तुम्ही पूर्ण 20 वर्षात 2,14,696 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 3,97,000 रुपये परतावा दिला जाईल. ही योजना फक्त 8 ते 55 वयोगटातील बालिका आणि महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ही योजना फक्त अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे जे लोक सामान्य, निरोगी जीवन जगतात आणि त्यांनी कधीही वैद्यकीय तपासणी केलेली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment plan of LIC Aadhaar Shila Policy for good returns on 22 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Investment Plan(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या