13 January 2025 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025 IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025
x

Investment Tips | या योजनेतील अल्प गुंतवणुकीवर 17 लाख रुपये परतावा मिळेल, शिवाय आयकर लाभ सुद्धा मिळवा

Investment tips

Investment Tips | आजच्या महागाईच्या काळात बचत करून गुंतवणुक करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. कुठे आणि कशी गुंतवणूक करावी हे ओळखणे देखील एक कला आहे. LIC आपल्या ग्राहकांच्या गुंतवणुकीची गरज पूर्ण करण्यासाठी नवनवीन योजना लाँच करत असते. LIC समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी गुंतवणूक योजना राबवत असते. LIC भारत सरकारची सर्वात मोठी विमा कंपनी असून नुकताच LIC चा IPO बाजारात सूचीबद्ध झाला होता.

जर सध्या तुम्ही गुंतवणूक करून मजबूत परतावा कमावून देणारी योजना शोधत असाल तर LIC ची जीवन लाभ पॉलिसी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर राहू शकते. एलआयसी जीवन लाभ पॉलिसी ही अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज 233 रुपये जमा करून 17 लाख रुपयेचा बंपर परतावा कमवू शकता. चला तर मग जाणून घेऊ LIC च्या जीवन लाभ पॉलिसी बद्दल थोडक्यात

LIC जीवन लाभ पॉलिसी :
LIC ची जीवन लाभ पॉलिसी एक नॉन-लिंक पॉलिसी आहे. याचा अर्थ ही योजना शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन नाही. शेअर बाजारातील चढ उताराचा या योजनेतील गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही. ही एक मर्यादित प्रीमियम प्रकारची जीवन विमा योजना आहे.

LIC जीवन लाभ पॉलिसीचे फायदे :
1. LIC ची जीवन लाभ पॉलिसी गुंतवणुकीवर व्याज परतावा आणि जीवन विमा संरक्षण दोन्ही देते.
2. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय मर्यादा 8 वर्ष आणि कमाल वय मर्यादा 59 वर्षे निर्धारित करण्यात आली आहे.
3. LIC च्या जीवन विमा पॉलिसीमध्ये मुदत 16 ते 25 वर्ष कालावधी साठी गुंतवणूक केली जाऊ शकते.
4. या योजनेत गुंतवणक करून लाभ मिळवण्यासाठी किमान 2 लाख रुपयांची विमा पॉलिसी घ्यावी लागेल.
5. कमाल गुंतवणूक रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
6. या योजनेत 3 वर्षांसाठी नियमित प्रीमियम भरल्यावर कर्ज घेण्याचीही सुविधा दिली जाते.
7. प्रीमियम आणि विमा रकमेवर कर सवलतीचा लाभ दिला जातो.
8. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसदाराला किंवा नॉमिनीला बोनस लाभ दिला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment tips in LIC Jeevan Labh Policy investment benefits and returns on 16 October 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x