13 January 2025 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिलांनो 2 वर्षांत 2 लाख रुपये मिळवायचे असतील तर 'या' योजनेत पैसे गुंतवा, मजबूत फायदा होईल Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर 45 टक्क्यांनी घसरला, आता तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: RVNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025 IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
x

Investment Tips | या गुंतवणूक योजनेत मिळेल 1 कोटी रुपयांचा थेट फायदा आणि कर्जाची सुविधाही, योजनेचा तपशील जाणून घ्या

Investment Tips

Investment Tips| जर तुम्हीही गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित योजना शोधत असाल तर एलआयसी तुमच्यासाठी घेऊन आली आहे “LIC जीवन शिरोमणी योजना”. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही लाखो रूपयांचा परतावा कमवू शकता. वास्तविक LIC जेव्हा एखादी गुंतवणूक योजना तयार करते, तेव्हा सर्व श्रेणीतील लोकांचा विचार करूनच योजनेचे नियम आणि अटी तयार करत असते. LIC जीवन शिरोमणी योजना ही LIC ची जीवन विमा आहे. ही एक सुरक्षित अल्पबचत योजना असून यात तुम्हाला जीवन विमा सुरक्षा कवच ही प्रदान केले जाते.

1 कोटी रुपयांची हमी रक्कम :
वास्तविक, LIC ची जीवन शिरोमणी योजना ही एक नॉन-लिंक योजना आहे, याचा अर्थ ही योजना बाजाराशी सलग्न नाही, किंवा बाजारातील चढ उताराचा ह्या योजनेवर कोणताही परिणाम होत नाही. या योजने गुंतवणूक केल्यास तुम्हाला किमान 1 कोटी रुपयांच्या जीवन विमा रकमेची हमी देखील दिली जाईल. LIC कॉर्प नेहमी आपल्या ग्राहकांना त्यांचे जीवन सुरक्षित आणि आर्थिकरित्या मजबूत करण्यासाठी अनेक फायदेशीर योजना बाजारात आणत असते.

पूर्ण योजना सविस्तर :
19 डिसेंबर 2017 रोजी LIC च्या जीवन शिरोमणी योजना (प्लॅन क्र. 847) सुरू करण्यात आली होती. या योजनेचे खास वैशष्ट्ये म्हणजे ही योजना नॉन-लिंक, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. ही योजना बाजाराशी कोणताही संबंध नसलेली जीवन लाभ योजना आहे. ही योजना LIC द्वारे खास HNI/हाय नेट वर्थ असलेल्या व्यक्तीसाठी बनवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला गंभीर आजारांसाठी देखील जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाईल. या योजनेत तुम्हाला 3 ऑप्शनल रायडर्स देखील उपलब्ध करून देण्यात येतील.

आर्थिक सहाय्य आणि लाभ :
LIC ची जीवन शिरोमणी योजना आपल्या पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला योजना चालू असताना त्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास आर्थिक मदत करते. या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास निश्चित कालावधीसाठी पैसे जमा करण्याची सुविधा दिली जाते,याशिवाय मुदत पूर्ण झाल्यावर एकरकमी रक्कम परताव्यासह परत दिली जाते.

सर्व्हायव्हल बेनिफिट :

सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणजेच पॉलिसीधारकांच्या जगण्यावर निश्चित टक्केवारीप्रमाणे पैसे दिले जातील. या अंतर्गत पेमेंट प्रक्रिया समजून घेऊ.
1) 14 वर्षांची पॉलिसी : 10वे आणि 12वे वर्ष 30-30 टक्के विम्याच्या रकमेचे पेआऊट केले जाईल.
2) 16 वर्षांचे पॉलिसी : 12वे आणि 14वे वर्ष 35-35 टक्के विम्याच्या रकमेचे पेआऊट केले जाईल.
3) 18 वर्षांचे पॉलिसी : 14वे आणि 16वे वर्ष 40 विम्याच्या रकमेचे 40 टक्के पेआऊट केले जाईल.
4) 20 वर्षांची पॉलिसी : 16 व्या आणि 18 व्या वर्षी विम्याच्या रकमेच्या 45-45 टक्के पेआऊट केले जाईल.

कर्ज सुविधाही उपलब्ध :
या पॉलिसीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसी चालू असताना योजनाधारक पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या आधारे गरज पडेल तेव्हा कर्ज घेऊ शकतो. पण हे कर्ज फक्त LIC ने नमूद करून दिलेल्या अटी आणि शर्तींवरच दिले जाईल. ह्या पॉलिसी अंतर्गत दिले जाणारे कर्ज वेळोवेळी ठरवल्या जाणार्‍या व्याजदरावर उपलब्ध करून दिले जाते.

योजनेच्या नियम व अटी :
* किमान विमा रक्कम : 1 कोटी रुपये
* कमाल विमा रक्कम : कोणतीही मर्यादा नाही (मूलभूत विमा रक्कम 5 लाखांच्या पटीत असेल.)
* पॉलिसीची मुदत : 14, 16, 18 आणि 20 वर्षे
* प्रीमियम भरण्याचा कालावधी : 4 वर्षे
* गुंतवणुकीचे किमान वय : 18 वर्षे
* गुंतवणुकीचे कमाल वय :

* 14 वर्षांच्या पॉलिसीसाठी 55 वर्षे
* 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 51 वर्षे
* 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 48 वर्षे
* 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 45 वर्षे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips in LIC Jeevan Shiromani scheme for life insurance coverage benefits on 1 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x