23 December 2024 7:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
x

Investment Tips | ही सरकारी गुंतवणूक योजना देतेय अधिक लाभ आणि इतर अनेक फायदे, योजनेचा तपशील जाणून घ्या

Investment Tips

Investment Tips| LIC आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन योजना जाहीर करत असते. नुकताच LIC ने धन संचय बचत योजना लॉन्च केली आहे. ही योजना 14 जून 2022 मध्ये गुंतवणूकदारांसाठी खुली करण्यात आली होती. सध्या तुम्ही ह्या योजनेत गुंतवणुक करू शकता. LIC धनसंचय पॉलिसी योजना चालू असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर पॉलिसीच्या पूर्ण कालावधीसाठी कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाईल. एवढेच नाही तर पॉलिसीच्या मुदतपूर्तीनंतर पेआउट कालावधीत हमी उत्पन्न देखील दिले जाईल. LIC ही भारतातील विमा क्षेत्रामधील सर्वात मोठी कंपनी आहे. LIC मधील गुंतवणूक सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवून देणारी असते.

योजनेची मुदत 5 ते 15 वर्ष :
LIC ने दिलेल्या माहितीनुसार, या विशिष्ट पॉलिसी योजनेत गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीच्या तारखेनंतर हमी दिलेले सर्व फायदे आणि लाभ योजनाधारकाला दिले जातील. याव्यतिरिक्त, गॅरंटीड टर्मिनल फायदे देखील गुंतवणूकदारांना मिळतील. या योजनेचा मुदतपूर्ती कालावधी 5 वर्षे ते कमाल 15 वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास निश्चित उत्पन्नाचे फायदे देखील मिळतील. इतकेच नाही तर वाढीव उत्पन्न लाभ, सिंगल प्रीमियम लेव्हल इन्कम बेनिफिट्स आणि सिंगल प्लॅनचे योजना धारकाला ​​उपलब्ध करून दिले जातील. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर्ज घेण्याची ही सुविधा दिली जाईल. धनसंचय योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही रायडर्स बेनिफिट चा लाभ देखील घेऊ शकता.

योजनेतील चार पर्याय :
LIC ने या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना चार पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. प्लॅन A आणि B अंतर्गत, मृत्यू झाल्यास 3,30,000 चे सम अॅश्युअर्ड लाइफ कव्हर मिळेल. तसेच, प्लॅन सी अंतर्गत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 2,50,000 रुपयांचे किमान जीवन विमा संरक्षण दिले जाईल. प्लॅन डी मध्‍ये व्यक्तीच्या मृत्यूवर 22,00,000 रुपयांचे जीवन विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाईल. या योजनांसाठी कोणतीही कमाल प्रीमियम मर्यादा ठरवण्यात आली नाही.

योजनेसाठी पात्रता जाणून घ्या :
LIC धन संजय योजनेची पॉलिसी घेण्यासाठी, तुमचे किमान वय 3 वर्षे असावे. प्लॅन A आणि प्लॅन B साठी कमाल वय मर्यादा 50 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. प्लॅन C साठी वायो मर्यादा 65 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. प्लॅन D साठी कमाल वय मर्यादा 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या योजनेत गुंतवणुकीची वयोमर्यादा किमान 3 वर्षे ते कमाल 40 वर्ष निश्चित करण्यात आली आहे.

योजनेत गुंतवणूक कशी करावी?
आपल्याला जर LIC च्या धनसंचय पॉलिसी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही एजंट द्वारे सहज गुंतवणूक करू शकता. किंवा तुम्हाला ऑनलाईन पर्याय ही देण्यात आले आहेत. या योजनेत ऑनलाईन गुंतवणूक करण्यासाठी www.licindia.in वेबसाइटला भेट द्या आणि थेट गुंतवणूक करा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips on LIC Dhansanchay Saving scheme for benefits on 05 October 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(145)#LIC Policy(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x