Investment Tips | या सरकारी योजनेत फक्त 45 रुपये जमा करून तुम्ही कमवू शकता जबरदस्त परतावा, जाणून घ्या या योजनेचे फायदे
Investment Tips | LIC आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या गुंतवणूक योजना बाजारात लाँच करत असते. तुम्ही जर LIC मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. LIC च्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे वाढवू शकता, आणि सोबतच तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता. LIC च्या या विशेष योजनेचे नाव आहे ” जीवन उमंग पॉलिसी”. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे जबरदस्त प्रमाणत वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या अप्रतिम योजनेबद्दल सविस्तर. जर तुम्हाला अल्प गुंतवणुकीत भरघोस परतावा कमवायचा असेल तर LIC जीवन उमंग पॉलिसी तुम्हाला मजबूत परतावा देऊ शकते. अगदी अल्प गुंतवणुकीसह, तुम्ही LIC च्या या योजनेत गुंतवणूक करून 36,000 रुपये वार्षिक परतावा कमवू शकता.
योजनेबद्दल थोडक्यात माहिती :
LIC ची जीवन उमंग पॉलिसी LIC च्या इतर जीवन विमा योजनांपेक्षा वेगळी आहे. या योजनेत पात्र वयोमर्यादा 90 दिवसांपासून ते 55 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ही एक एंडॉवमेंट योजना असून यामध्ये लाइफ कव्हरसह, मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम परताव्यासह परत केली जाते. योजनेच्या मुदतपूर्तीनंतर दर वर्षी तुमच्या खात्यात निश्चित रक्कम जमा केली जाईल. दुसरीकडे, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाईल. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही योजना तुम्हाला 100 वर्ष कालावधीपर्यंत लाईफ कव्हरेज प्रदान करते.
वार्षिक 36 हजार रुपये लाभ :
LIC च्या या पॉलिसीमध्ये तुम्ही दरमहा 1350 रुपये प्रीमियम जमा केले तर, एका वर्षात तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 16,200 रुपये होईल. जर तुम्ही पॉलिसी 30 वर्षे सुरू ठेवली आणि पैसे जमा करत गेलात तर तुमची गुंतवणूक रक्कम 4 लाख 86 हजार रुपये होईल. तुमच्या गुंतवणुकीवर 31 व्या वर्षापासून LIC तुम्हाला वार्षिक 36 हजार रुपये व्याज परतावा देईल.
टर्म रायडर बेनिफिट :
LIC च्या जीवन उमंग पॉलिसी अंतर्गत पॉलिसी धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास या योजनेत टर्म रायडर बेनिफिट देण्यात आला आहे. या पॉलिसी मधील गुंतवणुकीवर गुंतवणूक बाजारातील जोखमीचा कोणताही परिणाम होत नाही. या पॉलिसीवर LIC च्या नफा-तोट्याचा देखील कोणताही परिणाम होत नाही. आयकर कायदा कलम 80C अंतर्गत LIC जीवन उमंग पॉलिसी घेतल्यास तुम्हाला आयकरात कर सवलत दिली जाते. जर तुम्हाला LIC जीवन उमंग पॉलिसी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी दोन लाख रुपयांची विमा पोलिसी घ्यावी लागेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Investment Tips regarding LIC Jeevan Umang Policy benefits and investment returns on 10 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS