Investment Planning | रोज फक्त 30 रुपयांपेक्षाही कमी पैसे बचत करून ही गुंतवणूक करा आणि ४ लाख रुपये मिळवा
LIC Aadhaar Shila Policy |आज महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वीरित्या नाव कमवत आहे. आपल्या पायावर उभी राहून पैसे देखील कमवत आहे. प्रत्येक काम करणा-या महिलेला देखील वेगवेगळी स्वप्ने पूर्ण करण्यास गुंतवणूकीची गरज असते. अशात ज्या महिला गृहिणी आहेत त्या देखील आपल्या महिन्याच्या घर खर्चातून ठरावीक रकमेची बचत करत असतात. महिलांची बचत अधिक चांगली व्हावी तसेच त्यांना याचा नफा मिळावा यासाठी LIC ने एक नविन योजना आणली आहे. या योजनेचा महिलांना जास्तीत जास्त फायदा होईल.
या योजनेचे नाव आधारशिला योजना असे आहे. यामध्ये १८ ते ५५ वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. यासाठी त्यांना दररोज फक्त २९ रुपये भरावे लागणार आहेत. ३० रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून महिला मॅच्युरिटीवर ४ लाख रुपये मिळवू शकतात.
भरगोस कॅश बॅक
महिलांच भविष्य सुरक्षीत व्हाव यासाठी ही योजना काम करत आहे. यात २० वर्षांच्या कालावधीसाठी दिवसाला २९ रुपये म्हणजे महिना ८९९ रुपये जमा केल्यास एका वर्षात १०,९५९ रुपये जमा होतात. तर २० वर्षांत ही रक्कम २ लाख १४ हजार होते. संपूर्ण कालावधी पूर्ण झाल्यावर मॅच्युरिटीवर ३,९७,००० रुपये मिळतात.
या अटी पाळणे अनिवार्य
आधारशिला योजना ही फक्त महिलांसाठीच आहे. मात्र यात सर्वच महिला लाभ घेऊ शकत नाहीत. ज्या महिलांचे आधार कार्ड आहे त्याच महिला या योजनेच्या लाभार्ती होऊ शकतात. योजनेत कमाल २० आणि किमान १० वर्षांची गुंतवणूक केल्यावरच जास्त लाभ घेता येतो. जास्तीत जास्त ३ लाख रुपयांपर्यंत तुम्ही पैसे गुंतवू शकता. तर ७० वर्षांपर्यंत तुम्ही ही योजना एक्स्टेंड करू शकता. यावर रिटर्नमध्ये व्याजाचे पैसे १, ३, ६ अशा महिन्यांत मिळतात. मॅच्युरिटीवर महिलांना यात मोठा नफा मिळतो. तसेच या योजनेत सदर महिला तसेच जर तिचा मृत्यू झाला असेल तेव्हा महिलेच्या कुटूंबीयांना देखील मदत केली जाते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : LIC Aadharshila Policy invest only less than 30 rupees daily check details 14 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS