21 January 2025 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका
x

Closed LIC Policy | तुमची बंद पडलेली LIC पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एक संधी, सवलतही जाहीर केली, अधिक जाणून घ्या

LIC Policy

Closed LIC Policy | भारतातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय कंपनी LIC जिला आपण लाईफ इन्सुरन्स कॉर्पोरेशन म्हणूनही ओळखतो. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी दर वेळी नवनवीन ऑफर आणि योजना राबवत असते. या योजनांमध्ये गुंतवणूक, बचत आणि कर्ज अश्या अनेक प्रकारच्या योजनांचा समावेश होतो. आता LIC ने एक नवीन नियम जाहीर केला आहे. जी समजा तुम्ही एखादी पॉलिसी बंद केली, आणि तुम्हाला ती पुन्हा सुरू करायची आहे, तर त्यावर तुम्हाला आकारला जाणारा दंड शुल्क कमी करण्यात आला आहे. आणि योजना पुन्हा सुरू करण्याची संधीही दिली आहे. LIC च्या या नवीन नियम बदलामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक त्यांच्या बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा चालू करून गुंतवणूक करू शकतात. कंपनीने म्हटले आहे की युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स सोडून, बंद पडलेल्या सर्व पॉलिसी नाममात्र दंड भरून पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात.

योजनेची अंतिम मुदत :
समजा कोणत्याही कारणास्तव तुमची एखादी LIC पॉलिसी बंद झाली असेल, तर काळजी करू नका. तुम्ही आता 24 ऑक्टोबरपर्यंत अगदी नाममात्र दंड भरून त्या पॉलिसी मध्ये पुन्हा गुंतवणूक सुरू करू शकता. एलआयसीने आपल्या ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना विलंब शुल्कावर 30 टक्क्यांपर्यंत सुट देण्याचे जाहीर केले आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत, कोणताही पॉलिसी धारक नाममात्र विलंब शुल्क भरून आपले प्रीमियम पुन्हा जमा करून बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करू शकतो. विलंब शुल्क आणि त्यावर मिळणारी सूट पॉलिसीच्या प्रकारावर आणि प्रीमियमवर अवलंबून असते.

विलंब शुल्कात सूट मिळवण्याचे निकष :
जर समजा तुमची LIC पॉलिसी लॅप झाली असेल, किंवा काही कारणास्तव बंद पडली असेल तर तुम्हाला ती पुन्हा सुरू करता यावी यासाठी LIC ने एक बदल केला आहे. जर समजा पॉलिसी पॉलिसीची प्रीमियम 1 लाख रुपये असेल, तर अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराला विलंब शुल्कात 20 टक्के सूट दिली जाईल. ही सूट 2000 रुपयांपर्यंत असेल. जर पॉलिसीची प्रीमियम 1 लाख ते 3 लाख रुपयांच्या दरम्यान असेल तर, गुंतवणूकदाराला विलंब शुल्कावर 25 टक्के सूट दिली जाईल, आणि पॉलिसी पुन्हा सुरू केली जाईल. 3 लाख रुपयांच्या प्रीमियमसह पॉलिसीवर विलंब शुल्कात 30 टक्के सवलत दिली जाईल.

पॉलिसी रद्द होण्याचा कालावधी :
आरडीएआय ही इन्शुरन्स क्षेत्रातील नियमन करणारी नोडल संस्था मानली जाते. IRDAI च्या नियमांनुसार, ठराविक कालावधीत पॉलिसीचे प्रीमियम भरले नसल्यास आपली विमा पॉलिसी रद्द केली जाते. त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पॉलिसी चे पैसे भरण्यासाठी 30 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| LIC has Changed the Rules of closed policy and reduced the penalty charges on 15 September 2022.

हॅशटॅग्स

#LIC(66)closed policy(1)policy(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x